स्मार्टफोन उत्पादक कंपनी Xiaomi चा सब-ब्रँड असलेल्या Redmi ने भारतीय बाजारात नवीन स्मार्टवॉच लाँच केले आहे. रेडमी वॉच 5 ॲक्टिव्ह (Redmi Watch 5 Active ) स्मार्टवॉचमध्ये, कंपनीने पावरफुल बॅटरी लाइफसह ब्लूटूथ कॉलिंग सारखे भन्नाट फीचर्स दिले आहेत. या स्मार्टवॉचचे डिझाईनही खूपच स्टायलिश आहे जे तरुणांना आकर्षित करत आहे.
Redmi Watch 5 Active चे फीचर्स
2-इंचाचा LCD डिस्प्ले - हा डिस्प्ले 500 nits पर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो.
पावरफुल 70mAh बॅटरी - ही बॅटरी मॅग्नेटिक चार्जिंगलाही सपोर्ट करते.
18 दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप
नवीन स्मार्टवॉचचा पट्टा TPU मटेरियलपासून बनवला आहे.
स्मार्टवॉच हायपरओएस सॉफ्टवेअरवर आधारित आहे.
200+ क्लाउड वॉच फेस
स्मार्टवॉचमध्ये हिंदी भाषा सपोर्ट, इमोजी सपोर्ट आहे.
कस्टमाइझ रिंगटोन
Mi Fitness App देखील यात आहे.
IPX8 रेटिंगसह लाँच करण्यात आले आहे.
140 हून अधिक स्पोर्ट्स मोड
क्लिअर कॉलिंगसाठी स्मार्टवॉचमध्ये तीन माइकसह ENC सेटअप दिला आहे.
स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट सेन्सर, एक्सेलेरोमीटर आणि SpO2 सेन्सर देखील प्रदान करण्यात आला आहे.
फिमेल हेल्थ ट्रॅकिंग, स्टेप्स काउंटर फिचर्स
किंमत किती?
कंपनीने हे स्मार्टवॉच 3 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत बाजारात आणले आहे.कंपनीने Redmi Watch 5 Active भारतात 2799 रुपयांच्या किमतीत लाँच केले आहे. या स्मार्टवॉचमध्ये मॅट सिल्व्हर आणि मिडनाईट ब्लॅक सारख्या रंग उपलब्ध आहेत. मात्र याची विक्री ३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ऑनलाइन तुम्हाला हे स्मार्टवॉच खरेदी करता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.