पुणे, ता. २६ ऑगस्ट २०२४
गेल्या महिन्यामध्ये मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर आयटीएमएस (इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम) प्रणाली सुरू करण्यात आली होती. ही प्रणाली सुरू केल्यानंतर पहिल्या पंधरावड्यातच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 18,488 वाहनधारकांना ई-चालान करण्यात आले आहे. अशी माहिती संयुक्त परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर (Mumbai Pune Expressway) गेल्या महिन्यात ITMS (इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम) प्रणाली सुरू करण्यात आली आहे. नव्याने सादर करण्यात आलेल्या या प्रणालीच्या लाँचिंगनंतर पहिल्या पंधरवड्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 18,488 वाहनधारकांना ई-चालान करण्यात आले आहे. अशी माहिती संयुक्त परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी दिली आहे.
या कारवाईमध्ये आतापर्यंत ७ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी १९ जुलै रोजी ही प्रणाली सुरू केली होती. पहिल्या दोन आठवड्यात जवळपास ९० टक्के केसेस या वेगात गाडी चालवल्याबद्दल, 4 टक्के लेन कटिंगसाठी आणि बाकीच्या इतर गुन्ह्यांसाठी जसे की सीट बेल्ट न लावल्याबद्दल, महामार्गावरील बेकायदेशीर पार्किंग इत्यादीसाठी करण्यात आला आहे.
पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे हा राज्यातील महत्वाचा मार्ग समजला जातो. एक्सप्रेस हायवेवरून दररोज साधारणतः ४० हजार गाड्या ये जा करतात तर विकेंडला हा आकडा 60 हजारपर्यंत जातो. त्यामुळेच या महामार्गावर आयटीएस प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. या ITMS प्रणालीमुळे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील वेगावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळणार आहे. तसेच वेगावर नियंत्रण आल्यामुळे अपघातांची संख्या देखील कमी होण्यास मदत होणार आहे.
इंटेलिजेंट ट्रॅफिक मेनेजमेंट सिस्टीम ही वाहतूक कोंडीच्या (Traffic Control) समस्येचा सामना करणारी अद्ययावत प्रणाली आहे. यामध्ये कनेक्टेड तंत्रज्ञान वापरले जाते. आयटीएसएस प्रणालीमुळे रस्त्यांवर सुरक्षितता निर्माण होण्यास, गर्दी कमी होण्यास मदत होते. यामध्ये ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन अँड डेटा कलेक्शन, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅग, एअर क्वालिटी सेन्सर आणि तापमान सेन्सर यांसारखे अनेक महत्वाचे सेन्सर वापरले जातात. रिअल-टाइमची माहिती मिळविण्यासाठी अॅडव्हान्स व्हिडिओ डिटेक्शन प्रणाली वापरली जाते. यासाठी एचडी फुटेज आणि फोटोंचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीशी संबंधित समस्या सोडण्यासाठी रस्ते विभागाला या सुसज्ज प्रणालीची मोठी मदत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.