Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Sukanya Samriddhi Interest Rate : सुकन्या समृद्धी योजनेत ८.२ टक्के व्याजदर, वार्षिक १.५ लाख गुंतवणूक आणि २१ वर्षांनी संभाव्य ७१.८२ लाखांचा फंड कसा तयार होतो, जाणून घ्या संपूर्ण गणित.
Sukanya Samriddhi Yojana
Sukanya Samriddhi Yojanameta ai
Published On

तुमच्या घरी मुलगी जन्माला आली असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. मुलीच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतच्या भविष्यातल्या खर्चासाठी पालकांना सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय हवा असतो. केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) ही अशाच सुरक्षित बचत योजनांपैकी एक आहे. सध्या या योजनेवर ८.२ टक्के वार्षिक व्याजदर मिळत आहे. विशेष म्हणजे या योजनेत चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो.

वर्षाला कमाल १.५ लाख जमा करता येतात

सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यात एका आर्थिक वर्षात किमान २५० आणि कमाल १.५० लाख जमा करता येतात. मुलीच्या जन्मापासून वयाच्या १० वर्षांपर्यंत खाते उघडता येतं. खातं उघडल्यानंतर १५ वर्षांपर्यंत पैसे जमा करावे लागतात. मात्र खात्याची मॅच्युरिटी २१ वर्षांनी होते.

Sukanya Samriddhi Yojana
PF Privacy : कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! खासगी कंपन्या तुमचा PF-ITR डेटा पाहू शकतात का? वाचा...

जर पालकांनी मुलीच्या नावाने दरवर्षी १.५० लाख जमा केले, तर १५ वर्षात एकूण २२.५० लाखांची गुंतवणूक होते. त्यानंतर पुढचे सहा वर्षे नवीन रक्कम जमा करण्याची गरज नसते. जमा रकमेला नियमानुसार व्याज मिळत राहतं.

Sukanya Samriddhi Yojana
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! एकाचवेळी खात्यात येणार ₹4,000? जाणून घ्या सत्य

२१ वर्षांनी किती फंड मिळणार?

8.2 टक्के व्याजदर कायम राहिलं तर या उदाहरणानुसार २१ वर्षांच्या कालावधीनंतर ७१.८२ लाखांचा निधी तयार होऊ शकतो. मात्र व्याजदर सरकारकडून तिमाही आधारावर बदलला जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्यक्ष मॅच्युरिटी रक्कम बदलू शकते.

टॅक्समध्येही फायदा

सुकन्या समृद्धी योजना EEE (Exempt-Exempt-Exempt) या श्रेणीमध्ये येते. जुन्या कर प्रणालीमध्ये कलम 80C अंतर्गत पात्र गुंतवणुकीवर करसवलत मिळते. योजनेतले व्याज आणि नियमांनुसार मिळणारी मॅच्युरिटी रक्कमही टॅक्स फ्री असते. यामध्ये मुलींना १८ वर्षे झाल्यावर उच्च शिक्षणासाठी नियमानुसार खात्यातली ५० टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येते. लग्नाच्या प्रसंगीही नियमांनुसार खातं बंद करण्याची सुविधा उपलब्ध आहे. प्रत्यक्ष परतावा भविष्यातल्या सरकारी व्याजदरांनुसार बदलू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com