PF Privacy : कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! खासगी कंपन्या तुमचा PF-ITR डेटा पाहू शकतात का? वाचा...

ITR Data Privacy : खासगी कंपन्या कर्मचाऱ्यांचा पीएफ किंवा ITR डेटा थेट अॅक्सेस करू शकतात का, याबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. सर्वाच्च न्यायालयाच्या प्रकरणानंतर डेटा सुरक्षा आणि गोपनीयतेवर चर्चा सुरू झाली आहे.
PF Privacy
PF Privacy meta ai
Published On

कर्मचाऱ्यांचा पीएफ किंवा त्यांचा आयटीआरचा डेटा खासगी कंपन्या अॅक्सेस करू शकतात का? हा अनेकांच्या मनात प्रश्न होता. त्याचसंदर्भात एक प्रकरण उघडकीस आलं आहे. त्यामध्ये खासगी कंपन्या कर्मचाऱ्यांचा पीएफ किंवा आयटीआरच्या नोंदी त्यांच्या व्यवसायात भर घालण्यासाठी वापर आहेत असा दावा करण्यात आला होता.

या प्रकरणात दाखल केलेल्या जनहित याचिकेत (PIL) EPFO/UAN रेकॉर्ड आणि PANशी संबंधित आर्थिक माहितीच्या पडताळणीत एक “commercial technological ecosystem” तयार झाल्याचा आरोप करण्यात आला. काही खासगी सेवा EPFO पासबूक, Form 26AS आणि ITRशी संबंधित माहिती उपलब्ध करून देत असल्याचा दावा याचिकेत केलेला आहे.

PF Privacy
FD Break Rules: FD तोडण्याचा विचार करताय? आधी जाणून घ्या बँक किती पेनल्टी कापते आणि नुकसान कसे टाळाल

मात्र, सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही विशिष्ट कंपनीने बेकायदेशीरपणे डेटा मिळवल्याचं सिद्ध केलेलं नाही. तसेच खासगी कंपन्यांना नागरिकांचा ITR किंवा EPFO डेटा मुक्तपणे मिळू शकतो, असा कोणताही आदेश न्यायालयाने दिलेला नाही. डेटा लीक झाल्याचंही न्यायालयाने घोषित केलेलं नाही.

न्यायालयाने केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणांना या आरोपांचा विचार करून कार्यवाही केली आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, तज्ज्ञांच्या मदतीने या समस्येवर उपाययोजना करण्याचा विचार करण्याचे निर्देश दिलेले असून, शक्यतो चार महिन्यांच्या आता आवश्यक पावलं उचलायला सांगितली आहेत.

PF Privacy
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! एकाचवेळी खात्यात येणार ₹4,000? जाणून घ्या सत्य

तुमच्या डेटामध्ये नेमकं काय असतं?

बऱ्यादा खासगी कंपन्यांना भरती प्रक्रियेत उमेदवाराच्या पूर्वीच्या नोकरीची पडताळणी करण्याची कायदेशीर किंवा व्यावसायिक गरज असू शकते. मात्र, त्यासाठी योग्य संमती, कायदेशीर आधार आणि डेटा सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना आहेत का, हा या प्रकरणातल्या महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे सध्या नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही.

PF Privacy
8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

PAN किंवा UAN क्रमांक माहित असल्यामुळे कोणत्याही खासगी कंपनीला तुमचा संपूर्ण ITR किंवा EPFO रेकॉर्ड आपोआप उपलब्ध होत नाही. सरकारच्या तपासणीत अशा माहितीचा प्रत्यक्ष प्रवेश कसा होतो आणि विद्यमान सुरक्षा व्यवस्था पुरेशी आहे का, हे स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com