

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून देशातल्या शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) राबवली जाते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक मदत दिली जाते. आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या २४व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे यावेळी नेहमीच्या २ हजार रुपयांऐवजी ४ हजार रुपये मिळणार का, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वर्षाला ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येकी २ हजार रुपये अशा स्वरुपात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
सर्व पात्र शेतकऱ्यांना २४ व्या हप्त्यात ४ हजार रुपये मिळणार नाहीत. योजनेच्या नियमित नियमानुसार २४ व्या हप्त्यात २ हजार रुपयेच दिले जातील. मात्र, एखाद्या शेतकऱ्याचा मागील हप्ता काही कारणामुळे अडकला असेल आणि नंतर त्या हप्त्यासाठी आवश्यक असलेली अडचण दूर झाली असेल, तर सरकारकडून मागील थकीत हप्ता सुद्धा जमा केला जाऊ शकतो.
अशा परिस्थितीत संबंधित शेतकऱ्याला मागच्या २ हजार रुपये आणि २४ व्या हप्त्याचे २ हजार रुपये असं एकूण ४ हजार रुपये मिळू शकतात. मात्र हा लाभ केवळ पात्र आणि मागील हप्ता उशीरा असलेल्या शेतकऱ्यांना लागू होऊ शकतो.
२४वा हप्ता ऑक्टोबरमध्ये जारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र हप्त्याची ठरलेली तारीख अजून अधिकृतपणे जाहीर झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करणं महत्त्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.