8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

8th CPC Salary Calculation: आठव्या वेतन आयोगात २.१ फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यावर १८,००० बेसिक सॅलरीही ३८,००० रुपये होऊ शकते. मात्र अंतिम पगारवाढ सरकारच्या अधिकृत निर्णयानंतरच ठरेल.
8th CPC Salary Calculation
8th CPC Salary Calculationmeta ai
Published On

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आठवा वेतन आयोग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. विशेषत: फिटमेंट फॅक्टर किती असेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कर्मचारी संघटनांकडून २.७ ते ४ पर्यंत फिटमेंट फॅक्टरची मागणी केली जात असली, तरी २.१ फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यावरही बेसिक पगारात मोठी वाढ होऊ शकते.

सातव्या वेतन आयोगात २.५७ फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता. त्यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ७,००० रुपयांवरून १८,००० रुपये करण्यात आली आहे. मात्र त्या काळात कर्मचाऱ्यांना १२५ टक्के महागाई भत्ता (DA) मिळत होता. त्यामुळे ७,००० बेसिकवर ८,७५० DA मिळून एकूण रक्कम १५,७५० होत होती. नवीन बेसिक १८,००० झाल्यानंतर प्रत्यक्ष अतिरिक्त फायदा सुमारे २,२५० इतका राहिला.

8th CPC Salary Calculation
Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

आता आठव्या वेतन आयोगात २.१ फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास काय होऊ शकतं, याची एक संभाव्य गणना समोर आली आहे. सध्या किमान बेसिक सॅलरी १८,००० आहे. त्यावर २.१ फिटमेंट फॅक्टर लागू केल्याने नवीन बेसिक सॅलरी ३७,८०० ते ३८,००० होऊ शकते.

8th CPC Salary Calculation
Bank Holiday List: उद्या बँकेत काम असेल तर थांबा! महाराष्ट्रासह अनेक राज्यांत बँका बंद

सध्या ५८ टक्के DA गृहीत धरल्याने १८,००० बेसिकवर DA १०,४४० होतो आणि बेसिक तसेच DA मिळून २८,४४० होतात. त्याच्या तुलनेत ३८,००० नवीन बेसिक झाल्यावर ९,५६० इतका जास्तीचा फरक दिसू शकतो. म्हणजेच बेसिकच्या तुलनेत जवळपास ५२ ते ५३ टक्के वाढीचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com