Sukanya Samriddhi Yojana: दरमहा ₹1,500 गुंतवा; मुलीच्या नावावर जमा होईल ₹8.31 लाखांचा फंड

Government Scheme : दर महिन्याला ₹1,500 सुकन्या समृद्धी योजनेत जमा केल्यावर १५ वर्षात २.७० लाख गुंतवणूक होते. तसेच यावर ८.३१ लाख रुपयांचे व्याज मिळतं.
Sukanya Samriddhi Yojana
Sukanya Samriddhi Yojanameta ai
Published On: 

मुलीच्या जन्मानंतर आई-वडील तिच्या भविष्यातल्या खर्चासाठी बचत करायला सुरूवात करतात. त्यासाठी विश्वासू योजनेत गुंतवणूक करून भविष्यात मोठा लाभ मिळवतात. सध्या सुकन्या समुद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) ही खूप चर्चेतली आणि विश्वासू योजना मानली जाते. यामध्ये भविष्यासाठी रक्कम गुंतवली जाते. विशेष म्हणजे छोट्या रकमेपासून गुंतवणूक सुरू करण्याची सुविधा या योजनेत आहे.

दरमहा ₹1,500 जमा केल्यास किती पैसे मिळू शकतात?

केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा १,५०० जमा केल्यालवर वर्षाला एकूण १८,००० रुपये गुंतवणूक होते. १५ वर्षे अशाच पद्धतीने पैसे भरल्यावर एकूण २.७० लाख रुपये जमा होतील. दिलेल्या ८.२ टक्के वार्षिक व्याजदराच्या उदाहरणानुसार, या गुंतवणुकीवर ५,६१,९१७ रुपयांपर्यंत व्याज मिळू शकतं. त्यामुळे मॅच्युरिटीच्या वेळी एकूण रक्कम सुमारे ८,३१,९१७ म्हणजेच जवळपास ८.३२ लाख होऊ शकते. मात्र, हा हिशोब सध्याच्या ८.२ टक्के व्याजदराच्या आधारावर आहे. व्याजदरात बदल झाल्यावर अंतिम मॅच्युरिटी रक्कमही बदलू शकते.

Sukanya Samriddhi Yojana
PF खातेदारांसाठी मोठी संधी! 28 सप्टेंबरला EPFO संदर्भातील अडचणी होणार दूर

15 वर्षे पैसे जमा, 21 वर्षांनी मॅच्युरिटी

तुम्हाला या योजनेत खातं उघडल्यानंतर १५ वर्षांपर्यंत पैसे जमा करता येतात. तर खातं उघडल्यापासून २१ वर्षांनी मॅच्युरिटी होते. म्हणजेच १५ वर्षे गुंतवणूक केल्यानंतर पुढील ६ वर्षे नवीन पैसे जमा करण्याची गरज नसते. खात्यातल्या रकमेवर नियमानुसार व्याज मिळत राहतं.

Sukanya Samriddhi Yojana
8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! मिळणार ₹18 लाख एरियर? जाणून घ्या गणित

पैसे कधी जमा करता यालाही महत्त्व

मासिक गुंतवणुकीची तारीखही परताव्यावर परिणाम करू शकते. दिलेल्या उदाहरणानुसार, वर्षातल्या १८,००० रक्कम एप्रिलमध्ये एकरकमी जमा केल्याने मॅच्युरिटीची रक्कम सुमारे ८.६१ लाखांपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे गुंतवणुकीची वेळही महत्त्वाची ठरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com