PF खातेदारांसाठी मोठी संधी! 28 सप्टेंबरला EPFO संदर्भातील अडचणी होणार दूर

EPFO Special Camp: PF खातेदारांसाठी मोठी संधी! 28 सप्टेंबरला EPFOचा ‘निधी आपके निकट 2.0’ विशेष कॅम्प होणार असून प्रलंबित कामे, तक्रारी आणि PF संबंधित समस्यांवर अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करता येईल.
EPFO Big Update
EPFO Big Updatemeta ai
Published On: 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO कडून पीएफ खातेदारांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ‘निधी आपके निकट २.०’ या उपक्रमांतर्गत २८ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे. पीएफ खात्याशी संबंधित अडचणी, तक्रारी आणि रखडलेल्या कामांबाबत खातेदारांना या कॅम्पमध्ये थेट EPFO अधिकाऱ्यांशी संवाद साधता येणार आहे.

EPFO ने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म‘एक्स’वर या कॅम्पची माहिती दिलेली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश EPFOच्या सेवा आणि योजनांची माहिती खातेदारांपर्यंत पोहोचवणे, तसेच पीएफशी संबंधित समस्या आणि तक्रारींचे निराकरण करण्यासाठी त्यांना थेट मार्ग उपलब्ध करून देणं हा आहे.

EPFO Big Update
8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! मिळणार ₹18 लाख एरियर? जाणून घ्या गणित

कोणत्या समस्यांसाठी कॅम्प फायदेशीर?

PF खात्याशी संबंधित एखादं काम ऑनलाइन प्रोसेसमध्ये अडकले असेल किंवा एखाद्या विशिष्ट कारणामुळे त्याचे निराकरण होत नसेल, तर खातेदार कॅम्पमध्ये आपली समस्या संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडू शकतात. EPFOच्या योजना, फायदे, सेवा आणि विविध प्रक्रियांबाबतही अधिकाऱ्यांकडून माहिती घेता येईल.

EPFO Big Update
Lemon: कोणत्या पदार्थांवर लिंबू पिळून खाऊ नये? वेळीच घ्या जाणून

तक्रारींच्या निराकरणावर भर

‘निधी आपके निकट २.०’ कॅम्पमध्ये फक्त तक्रारी ऐकून घेण्याऐवजी त्यावर शक्य तितक्या लवकर कार्यवाही करण्यावर भर दिला जाणार आहे. मात्र, प्रत्येक समस्येचे निराकरण कॅम्पमध्येच आणि त्याच दिवशी होईल, असे नाही. तक्रारीचे स्वरूप आणि आवश्यक प्रक्रियेनुसार त्याला अधिक वेळ लागू शकतो.

कॅम्पला जाताना काय काळजी घ्यावी?

PFशी संबंधित समस्या असल्यास खातेदारांनी कॅम्पला जाण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे, उपलब्ध खातेविषयक माहिती आणि तक्रारीशी संबंधित तपशील सोबत ठेवणे फायदेशीर ठरेल. त्यामुळे अधिकाऱ्यांना प्रकरण समजून घेणे आणि पुढील कार्यवाही करणे सोपे होऊ शकते. त्यामुळे पीएफ खात्यातले रखडलेले काम किंवा तक्रार असेल तर २८ सप्टेंबरच्या ‘निधी आपके निकट २.०’ कॅम्पचा उपयोग करून घेता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com