8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! मिळणार ₹18 लाख एरियर? जाणून घ्या गणित

8th Pay Commission Salary Hike: आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू व्हायला उशीर झाल्यावर केंद्रीय कर्मचाऱ्यांना एरियर मिळतो. २.५७ फिटमेंट फॅक्टर आणि १८ लाख रुपयांचे एरियरचे गणित समजून घ्या.
Central Government Employees
Central Government Employeesgoogle
Published On: 

8th Pay Commission Latest: तुम्ही सरकारी कामगार असाल तर तुमच्यासाठी ही माहिती दिलासादायक ठरणार आहे. आयोग पुढच्या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सरकारकडे आपल्या शिफारशी सादर करू शकतो. मात्र, या शिफारशी लागू करण्यासाठी बराच वेळ लागू शकतो.

जर शिफारशी लागू करायला उशीर झाला आणि त्या १ जानेवारी २०२६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने arrears सहित लागू करण्यात आल्या, तर कर्मचाऱ्यांना थकीत रकमेच्या स्वरुपात एरियर मिळू शकतो. मात्र, अद्याप सरकार किंवा आठव्या वेतन आयोगाने अंमलबजावणीची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही.

Central Government Employees
Lemon: कोणत्या पदार्थांवर लिंबू पिळून खाऊ नये? वेळीच घ्या जाणून

Level-8 कर्मचाऱ्यांना ₹18 लाख एरियर कसा?

उदाहरण म्हणून Level-8 कर्मचाऱ्यांचे सध्याचे बेसिक पे ₹47,600 गृहीत धरलं आहे. जर 2.57 फिटमेंट फॅक्टर लागू झाला, तर सुधारित बेसिक पे अंदाजे ₹1,22,332 होऊ शकतो. म्हणजेच बेसिक पे मध्ये ₹74,732 ची वाढ होईल.

जर नवीन वेतनरचना लागू व्हायला 24 महिन्यांचा उशीर झाला, तर फक्त बेसिक पेच्या फरकानुसार ₹74,732 × 24 = ₹17,93,568, म्हणजे जवळपास ₹18 लाख एरियर होऊ शकतो.मात्र ही रक्कम निश्चित नाही. हा फक्त 2.57 फिटमेंट फॅक्टर आणि २४ महिन्यांच्या उशीरावर आधारित उदाहरणात्मक अंदाज आहे. प्रत्यक्ष एरियरमध्ये भत्ते, कपाती आणि अंतिम सरकारी निर्णयानुसार फरक पडू शकतो.

Central Government Employees
PM Kisan Yojana: ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपयांचा हप्ता येणार? वाचा नविन अपडेट

आयोगाच्या बैठका सुरू

आठवा वेतन आयोग सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन, फिटमेंट फॅक्टर, भत्ता आणि पेन्शनशी संबंधित मुद्द्यांवर विविध भागधारकांशी चर्चा करत आहे. राजस्थान, तामिळनाडू आणि चंदीगडसह विविध ठिकाणी बैठका झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com