Success Story: फक्त २० मिनिटांत १० एकर शेतीवर औषध फवारणी; नंदुरबारच्या तरुणाचा भन्नाट प्रयोग!

Success Story Of Nandurbar Boy: नंदुरबारच्या एका मुलाने चक्क २० मिनिटात १० एकर शेतीवर औषध फवारणी करणारा बूम स्प्रे तयार केला आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

शेतकरी हा कधीच खचत नाही असं म्हणतात. कितीही संकंटे आली तरी त्यावर मात करुन वेगवेगळे प्रयोग करत असतात. शहादा तालुक्यातील एका तरुणाने भंगार गोळा करुन हायड्रोलिम बूम स्प्रे बनवला आहे. हा स्प्रे वीस मिनिटांत दहा एकर शेतात किटकनाशक फवारणी करतो. यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड फायदा झाला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा या गावातील कमलेश चौधरी हा कृषी क्षेत्रात पदवीधर आहे. तो खाजगी कंपनीत नोकरी करत होतो. परंतु वडिलांच्या आजारामुळे कमलेश पाच वर्षांपूर्वी त्याच्या गावी आला.

Success Story
Dmart Success Story: छोट्याशा खोलीतून उभारलं कोटींचं साम्राज्य, वर्षभर डिस्काउंट मिळणाऱ्या D-Mart ची अशी होती कहाणी

कमलेशच्या वडिलांच्या निधनानंतर तो त्यांची दहा एकर शेती करु लागला. त्याने गावाबाहेरील एका गोडाऊनमध्ये सर्व टाकाऊ वस्तू ठेवल्या होत्या. या टाकाऊ वस्तूंवर तो दरवर्षी प्रयोग करायचा. युट्यूबवरुन शिकून त्याने २७ फूट लांब बूम स्प्रे मॅन्युअली तयार केला होती. त्यातून त्याने शेतात औषध फवारणी केली. यावर्षी त्याने चक्क ५५ फूट लांब हायड्रोलिक तयार केला.

हा स्प्रे २० ते २५ मिनिटांत दहा एकर शेतीवर कीटकनाशक आणि तणनाशक फवारणी करतो. यासाठी त्याने जुने ट्रॅक्टर साडेतीन लाख रुपयाला खरेदी केले होते. त्यासाठी त्याने पंजाब येथून ७५ हजाराचे बुस्टनचे एअरलेस टायर मागवले होते. त्याला एक लिटरची टाकी बसवली. यासाठी ४५ हजार रुपये खर्च आला.त्यानंतर त्याने औषध फवारणीसाठी स्पीड पंप बसवला.

Success Story
UPSC Success Story : वाह रे पठ्ठ्या! १, २ नाही तब्बल ३५ वेळा दिली परीक्षा; IAS विजय वर्धन यांचा संघर्ष एकदा वाचाच

कमलेशच्या या प्रयोगामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. या मशीनमुळे समप्रमाणात फवारणी केली जाते. या मशीनमुळे मजुरांची टंचाई भासत नाही. कमी वेळात हे काम होते. त्याचसोबत पैशाची बचत होते. तसेच कोणत्याही प्राण्याला काहीच त्रास होत नाही. कमलेशच्या या यशस्वी प्रयोगामुळे शेतकऱ्यांचे बरेचसे काम कमी झाले आहे.

Success Story
Chai Sutta Bar Owner: व्हायचे होते IAS पण झाला चहावाला; ३ लाखात व्यवसायात उतरला, आता १५० कोटींचा मालक, वाचा Success Story

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com