Pimpri Chinchwad
Pimpri Chinchwad Saam tv

Pimpri Chinchwad : अट्टल गुन्हेगारांची टोळी ताब्यात; १५ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Pimpri chinchwad : मध्य प्रदेश राज्यातून पिंपरी चिंचवड शहरात देशी कट्ट्यांची तस्करी करून विकणाऱ्या टोळीकडून पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या मालमत्ता विरोधी गुन्हे शाखा पोलीस पथकाने शस्त्रांचा साठा जप्त केला आहे
Published on

पिंपरी चिंचवड : देशी कट्ट्यांची तस्करी करून विक्रीच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड शहर आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकरून ७ देशी कट्टे, १४ जिवंत काडतुसे, दोन मॅगझिन आणि एक चारचाकी वाहन असा एकूण १५ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मध्य प्रदेश राज्यातून पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात देशी कट्ट्यांची तस्करी करून विकणाऱ्या टोळीकडून पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या मालमत्ता विरोधी गुन्हे शाखा पोलीस पथकाने शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तसेच या टोळतील पाच अट्टल गुन्हेगारांना मालमत्ता विरोधी गुन्हे शाखा पोलिसांनी आळंदी (Police) पोलीस स्टेशन हद्दीतून बेड्या ठोकल्या आहेत. प्रदीप उर्फ अक्षय बाळासाहेब ढगे, सुरज अशोक शिवले, नवल वीरसिंग झांमरे, कमलेश उर्फ डॅनी कानडे आणि पवन दत्तात्रय शेजवळ अशी बेड्या ठोकलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. 

Pimpri Chinchwad
Jalgaon News : हृदयद्रावक..पतीला त्रास होत असल्याने रुग्णालयात नेले; पत्नीचाच हृदयविकाराने मृत्यू

यातील नवल वीरसिंग झांमरे हा मध्य प्रदेश जिल्ह्यातील बुऱ्हानपूरचा मुळ रहिवासी असून तो तेथून देशी कट्टे, मॅगझिन आणि जिवंत काडतुसे आणून पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारांना साथीधारामार्फत विकत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या मालमत्ता विरोधी गुन्हे शाखा पोलिसांनी ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com