Chhatrapati Sambhajinagar: शेतकऱ्यांनो सावधान! कीटकनाशक फवारताना विषबाधा होऊन तरुणाचा मृत्यू; कशी घ्याल काळजी?

Maharashtra Breaking News: रविवारी रोहित शेतातील पिकावर विषारी औषध फवारणी करण्यासाठी गेला होता. शेतामध्ये औषध फवारत असताना त्वचेवाटे औषध शरीरात गेल्याने त्याला विषबाधा झाली.
Chhatrapati Sambhajinagar: शेतकऱ्यांनो सावधान! कीटकनाशक फवारताना विषबाधा होऊन तरुणाचा मृत्यू; कशी घ्याल काळजी?
Maharashtra Breaking News:Saamtv
Published On

छत्रपती, संभाजीनगर|ता. १७ जून २०२४

शेतामध्ये कीटकनाशकांची फवारणी केल्यावर त्वचेवाटे विषबाधा झालेल्या २८ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. रोहित बाबासाहेब थेटे असे मृत तरुणाचे नाव असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापुर तालुक्यात घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Chhatrapati Sambhajinagar: शेतकऱ्यांनो सावधान! कीटकनाशक फवारताना विषबाधा होऊन तरुणाचा मृत्यू; कशी घ्याल काळजी?
Laxman Hake VIDEO : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली, शुगर आणि पाणी झालं कमी; उपचार नाकारले!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील तरुण रोहित थेटे हा आई- वडील व पत्नीसोबत सावखेडगंगा शिवारात शेतवस्तीवर राहतो. रविवारी रोहित शेतातील पिकावर विषारी औषध फवारणी करण्यासाठी गेला होता. शेतामध्ये औषध फवारत असताना त्वचेवाटे औषध शरीरात गेल्याने त्याला विषबाधा झाली.

ही बाब कुटुंबियांच्या लक्षात आल्यावर त्यांनी रोहितला तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु सोमवारी (१७ जून) उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने थेटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी विरगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Chhatrapati Sambhajinagar: शेतकऱ्यांनो सावधान! कीटकनाशक फवारताना विषबाधा होऊन तरुणाचा मृत्यू; कशी घ्याल काळजी?
Maharashtra Politics: अजित पवार भाजप-शिवसेनेला का नकोसे? महायुतीत पुन्हा वादाचे फटाके, नेमकं काय घडतंय? पाहा VIDEO

शेतात औषध फवारणी करताना अशी घ्या काळजी?

. शेतात किटकनाशके फवारण्याआधी त्यासोबत दिलेले माहितीपत्रक वाचून घ्यावे. ज्यामध्ये औषध हाताळताना काळजी घेण्याबाबत महत्वाच्या सूचना केलेल्या असतात.

२. औषध फवारणी करताना संपूर्ण अंग झाकतील असे जाड कपडे, गॉगल, तोंडाला मास्क, पायात मोठे बूट प्रामुख्याने वापरावे.

३. औषध फवारणी पूर्ण होईपर्यंत धुम्रपान करणे किंवा काहीही खाणे टाळावे.

४. औषध फवारणी झाल्यानंतर अंघोळ करुनच खाणे- पिणे करावे.

५. औषध फवारणीनंतर कोणताही त्रास जाणवू लागल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Chhatrapati Sambhajinagar: शेतकऱ्यांनो सावधान! कीटकनाशक फवारताना विषबाधा होऊन तरुणाचा मृत्यू; कशी घ्याल काळजी?
Pune News : पुण्यातील १३ लाख फॉलोअर्स असलेली 'ती' बेपत्ता रिलस्टार अखेर सापडली; इतके दिवस नेमकी कुठे होती?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com