Pune News : पुण्यातील १३ लाख फॉलोअर्स असलेली 'ती' बेपत्ता रिलस्टार अखेर सापडली; इतके दिवस नेमकी कुठे होती?

Missing Social Media Influencer Found: पुण्यातून १५ जूनपासून बेपत्ता असलेली सोशल मीडिया ‘इन्ल्फूएन्सर’ सापडली आहे. कोथरूड परिसरामध्ये ती सापडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
बेपत्ता असलेली सोशल मिडीया ‘इन्ल्फूएन्सर’ सापडली
Missing Social Media Influencer FoundSaam Tv

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

पुण्यातून बेपत्ता झालेली प्रसिद्ध रिलस्टार "माऊ" अखेर सापडली आहे. या तरूणीचं नाव मयूरी चैतन्य मोडक-पवार असं आहे. ती सुखरूप असुन, कोथरूड भागात होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तिचे इन्स्टाग्रामवर तब्बल १.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. मयुरी १५ जूनपासून घरातून निघून गेली होती. त्यामुळे कुटुंबात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयूरी पवार ही सोशल मीडिया ‘इन्ल्फूएन्सर’ आहे. तिला सोशल मीडियावर ‘माऊ’ या नावाने ओळखले जाते. इन्स्टाग्रामवर तिचे तब्बल १.३ मिलियन फॉलोअर्स (Pune Breaking News) आहेत. तिने ‘दुर्गा ग्रुप’ नावाने संस्था स्थापन केली आहे. याद्वारे ती कपड्यांचा व्यवसाय करते. मयूरी ही १५ जून रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेली होती.

पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. अखेर काल सायंकाळी कोथरूड भागात ती सापडली. तिच्याकडे विचारपूस केली जात आहे. घरामध्ये तिने लिहिलेली सुसाईड नोट सापडली (Social Media Influencer) होती. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात ‘बेपत्ता’ असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस मयुरीचा शोध घेत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं अन् बेपत्ता असलेली मयुरी सापडली.

बेपत्ता असलेली सोशल मिडीया ‘इन्ल्फूएन्सर’ सापडली
Social Media: सावधान! सोशल मीडियावर सायबर पोलिसांची करडी नजर; आक्षेपार्ह पोस्ट केल्यास थेट गुन्हे दाखल होणार

मयूरी १५ जून रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास घरामधून निघून गेली होती. तिने या संदर्भामध्ये कोणालाही काहीही सांगितलेलं (Social Media Influencer Missing) नव्हतं. याप्रकरणी मंगल दिलीप पवार यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात मयुरी हरवल्याची तक्रार दिली होती. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक संतोष मोरे तपास करीत होते. पोलीस मयुरीचा शोध घेत होते. १५ जूनपासून मयूरी बेपत्ता (Pune News) होती.

बेपत्ता असलेली सोशल मिडीया ‘इन्ल्फूएन्सर’ सापडली
Gurucharan Singh Missing Case : 'तारक मेहता...' फेम सोढीचं शेवटचं लोकेशन सापडलं; बेपत्ता झाल्यावर ३ दिवस ‘इथं’ मुक्काम, एटीएममधून पैसे काढले अन्…

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com