Maharashtra Politics: अजित पवार भाजप-शिवसेनेला का नकोसे? महायुतीत पुन्हा वादाचे फटाके, नेमकं काय घडतंय? पाहा VIDEO

Ajit Pawar Mahayuti Crisis News : अजितदादांना सोबत ठेवण्याबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी काही आमदारांनी पक्षश्रेष्ठीकडे केल्याची माहिती आहे.
अजित पवार भाजप-शिवसेनेला नकोसे? महायुतीत पुन्हा वादाचे फटाके, नेमकं काय घडतंय?
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra FadanvisSaam Tv
Published On

लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. महाराष्ट्रातील ४८ पैकी केवळ १७ जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आले. या निकालानंतर आता महायुतीत वादाचे फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्याविषयी भाजप-शिवसेना आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. अजितदादांना सोबत ठेवण्याबाबत पुर्नरविचार करावा, अशी मागणी काही आमदारांनी पक्षश्रेष्ठीकडे केल्याची माहिती आहे.

खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार आता भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांना नकोसे झाले आहेत. त्यांना सोबत घेतल्यानेच लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसल्याचं काही आमदारांचं मत आहे. अजित पवार गटाची मते आम्हाला मिळालीच नाही, अशी तक्रार देखील काही पराभूत उमेदवारांनी केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

इतकंच नाही, तर या पराभूत उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात मतांची आकडेवारीच पक्षश्रेष्ठींसमोर ठेवल्याची माहिती आहे. यात माढा, सोलापूर, दिंडोरी, मावळ, शिरूर आदी मतदारसंघांचा समावेश आहे. इतर मतदारसंघातही अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि नेते सक्रिय नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

या कारणामुळे अजित पवार यांना सोबत ठेवण्याचा पुनर्विचार करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान, याविषयी अजून कुणीही उघडपणे बोलले नाही. मात्र भाजप आणि शिंदे गटात अजित पवार यांच्याविषयी कुजबूज असल्याची माहिती आहे.

अजित पवार भाजप-शिवसेनेला नकोसे? महायुतीत पुन्हा वादाचे फटाके, नेमकं काय घडतंय?
Maharashtra Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली; भावी मंत्र्यांमध्ये आनंदाची लाट, कुणाची वर्णी लागणार?

विशेष बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातूनही अजित पवार यांना सोबत का घेतले? असा प्रश्न भाजप नेत्यांना विचारण्यात आला होता. विधानसभेत शिंदे गट आणि भाजपकडे बहुमत असताना देखील अजित पवार यांना सत्तेत का सामील करून घेतले? असा सवाल मुखपत्रातून विचारण्यात आला होता.

यानंतर अजित पवार भाजपला नकोसे झाले आहेत का? अशी चर्चा रंगली होती. संघाच्या मुखपत्राने उपस्थित केलेल्या या प्रश्नांवर कुणीही उघडपणे भाष्य केले नाही. त्याचबरोबर अजित पवार यांची कुणी पाठराखण करण्याचा देखील प्रयत्न केला नाही.

आता थेट भाजप-शिवसेना आमदारांना अजित पवार नकोसे झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्रित लढणार, की स्वबळाचा नारा देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

अजित पवार भाजप-शिवसेनेला नकोसे? महायुतीत पुन्हा वादाचे फटाके, नेमकं काय घडतंय?
PM-Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज २००० रुपये जमा होणार; पेरणीच्या खर्चाचं टेन्शन मिटणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com