मुंबई : शेअर बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी अचानक तेजी पाहायला मिळाली. शेअर बाजार तेजीत ओपन झाला. त्यानंतर तेजीतच बंद झाला. शेअर बाजारातील तुफान तेजीमुळे गुंतवणूकदार मालामाल झाले.
शेअर बाजारात सेन्सेक्सने १३०० अंकांनी उसळी घेतली. तर निफ्टीने ४४० अंकानी उसळी घेतली. शुक्रवारी सकाळी सेन्सेक्स ८०,१५८.५० वर पोहोचून सुरु झाला होता. त्यानंतर दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स १,३४७.३६ अंकांनी उसळी घेत ८१,३८७.१६ अंकावर बंद झाला. तर निफ्टी २४,४२३.३५ वर सुरु झाला. तर दिवसभराच्या कामकाजानंतर ४४३ अंकांनी उसळी घेऊन २४,८४९.६० अंकांवर बंद झाला.
आजच्या दिवसभराच्या व्यवहारानंतर टेलिकॉम कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्सच्या टॉप-३० कंपन्यांपैकी सर्वाधिक तेजी ही एअरटेलच्या शेअरमध्ये पाहायला मिळाली. एअरटेलच्या शेअरमध्ये ५ टक्क्यांनी तेजी दिसून आली. तर वोडा आयडियाच्या शेअर्सनेही देखील ५ टक्क्यांनी उसळी घेतली.
लार्जकॅपच्या अपोलो हॉस्पिटलच्या शेअर्सने ४ टक्क्यांनी उसळी घेतली. तर अदानी पोर्ट्सने ४ टक्क्यांनी आघाडी घेतली. तर अदानी एंटरप्रायजेसनेही ४ टक्क्यांनी तेजी घेतली. विप्रोच्या शेअर्सने ३.६४ टक्क्यांनी आघाडी घेतली.
दुसरीकडे पेटीएमचे शेअर्सही चांगले तेजीत आहेत. तर श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्सच्या शेअर्सने ९ टक्क्यांनी आघाडी घेतली. अशोक लेलँडच्या शेअर्सने ६ टक्क्यांनी आघाडी घेतली. एमजीएलच्या शेअर्सने ५.३१ टक्क्यांनी आघाडी घेतली.
श्रीराम फायनान्सचा शेअर ९.१८ टक्क्यांनी आघाडी घेऊन २,९२५ रुपयांवर बंद झाला. डिव्हि लॅबचा शेअर ५.३६ टक्क्यांनी आघाडी घेऊन ४७९० रुपयांवर बंद झाला. टाटा पॉवरचे ५ टक्क्यांनी तेजीत होते. अशोक लेलँडचेय शेअर ६ टक्क्यांनी उसळी घेऊन २४६ अंकावर बंद झाला. अमारा राजा एनर्जीच्या शेअर्सने ७ टक्क्यांनी आघाडी घेत १६८० अंकावर बंद झाला. फाईव्ह स्टार बिझनेसनेही ५ टक्क्यांनी आघाडी घेतली.
दरम्यान, बजेटच्या दिवशी कॅपिटल गेन टॅक्समुळे शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. त्यानंतर बुधवारी आणि गुरुवारी बाजारात मोठा बदल झाल्याचे दिसून आले नाही. त्यानंतर शुक्रवारी शेअर बाजारात तुफान तेजी दिसून आली. या तेजीमुळे गुंतवणूकदार मालामाल झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.