Ladki Bahin Yojana: केवळ १० हजारांत सुरु करू शकता 'हा' बिझनेस; लाडक्या बहिणीचे पैसे गुंतवण्यासाठी उत्तम पर्याय

Business Idea: योजनेतून मिळालेल्या पैशांच्या गुंतवणूकीबाबत तुम्ही काही विचार केलाय का? जर तुम्हाला हे पैसे गुंतवायचे असतील तर आम्ही तुम्हाला बिझनेस आयडिया देणार आहोत.
Ladki Bahin Yojana Money
Ladki Bahin Yojana Moneysaam tv
Published On

लाडकी बहिण योजनेतून आतापर्यंत अनेक महिलांना पैसे मिळालेत. कदाचित तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळाला असेल. मात्र या योजनेतून मिळालेल्या पैशांच्या गुंतवणूकीबाबत तुम्ही काही विचार केलाय का? जर तुम्हाला हे पैसे गुंतवायचे असतील तर आम्ही तुम्हाला बिझनेस आयडिया देणार आहोत.

आजच्या काळात लोक वेगवेगळ्या बिझनेस आयडियावर काम करून लाखो रुपये कमवतायत. अनेक वेळा पैशाअभावी किंवा व्यवसायाची कल्पना नसल्यामुळे आपण आपला बिझनेस सुरू करू शकत नाही. असे अनेक व्यवसाय आहेत जे केवळ 10,000 रुपयांपासून सुरू केले जाऊ शकतात.

Ladki Bahin Yojana Money
Ladki Bahin Yojana: हा एक बिझनेस करेल तुम्हाला मालामाल; लाडकी बहिण योजनेतून मिळालेले पैसे इथेच गुंतवा

तुम्हाला कमीत कमी दहा हजार रुपये गुंतवून बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्हाला छोट्या प्रमाणावर सुरुवात करून हळूहळू विस्तार करावा लागणार आहे. हा व्यवसाय तुम्हाला अधिकाधिक नफा देणार आहे. तुम्ही मेहनत आणि वेळ देऊन तो चांगल्या प्रकारे चालवू शकता.

पाण्याच्या बाटलीचा बिझनेस

तुम्ही पाण्याच्या बाटल्या विकत घेऊ शकता आणि त्यांची पुन्हा विक्री करू शकता. हे लहान प्रमाणात सुरू केलं जाऊ शकतं. त्यानंतर हळूहळू तुम्ही हा बिझनेस विस्तारित करू शकता. याशिवाय तुम्हाला बाटली बनवण्याचं मशीन घ्यावं लागणार आहे. हे करण्यासाठी तुम्हाला एका मोठ्या खोलीची व्यवस्था करावी लागेल. यामध्ये तुम्ही तुमच्या बाटल्या बनवून साठवून ठेवाल.

Ladki Bahin Yojana Money
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीतून मिळालेल्या पैशांनी सुरू करा 'हा' बिझनेस; प्रत्येक दिवसाला कराल ३ हजारांची कमाई

हे मशीन विकत घेणं दुसरं म्हणजे बाटल्या बनवण्यासाठी प्लास्टिक खरेदी करणं. बाटली बनवल्यानंतर ती विकण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला थोडी मेहनत करावी लागेल. मात्र एकदा मार्केटमध्ये तुमची माहिती झाली की व्यापारी तुम्हाला ऑर्डर देतील.

Ladki Bahin Yojana Money
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीतून मिळालेल्या पैशांनी सुरू करा 'हा' बिझनेस; प्रत्येक दिवसाला कराल ३ हजारांची कमाई

घरगुती खाद्य व्यवसाय

तुम्ही नमकीन, पापड, लोणची, वडा इत्यादी घरगुती पदार्थ बनवून विकण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. हे काम तुम्ही तुमच्या घरातही सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला दोनपेक्षा जास्त लोकांची गरज भासू शकते. अशा परिस्थितीत सुरुवातीला कामगार ठेवण्याऐवजी तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणाची तरी मदत घेऊ शकता. या कामासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही.

Ladki Bahin Yojana Money
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीतून मिळालेल्या पैशांनी सुरू करा 'हा' बिझनेस; प्रत्येक दिवसाला कराल ३ हजारांची कमाई

या बिझनेसाठी पहिल्यांदा तुम्हाला तुमचं उत्पादन किराणा दुकानात पोहोचवावं लागेल. यासोबतच शक्य असल्यास सोशल मीडियाचा वापर करून तुमच्या शहरात किंवा परिसरात होम डिलिव्हरी सुरू करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com