Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanasaam tv

Ladki Bahin Yojana: हा एक बिझनेस करेल तुम्हाला मालामाल; लाडकी बहिण योजनेतून मिळालेले पैसे इथेच गुंतवा

Ladki Bahin Yojana Money Investment: लाडक्या बहिणीच्या पैशांमधून तुम्हाला अजून पैसे कमवायचे असतील तर आज आम्ही तुम्हाला एक बिझनेस आयडिया देणार आहोत.
Published on

महाराष्ट्रात लाडकी बहिण योजना सुरु करण्यात आली असून या योजनेचा अनेक महिलांनी लाभ घेतला आहे. लाडक्या बहिणीच्या पैशांमधून तुम्हाला अजून पैसे कमवायचे असतील तर आज आम्ही तुम्हाला एक बिझनेस आयडिया देणार आहोत. या बिझनेसमध्ये तुम्ही पैसे गुंतवून अजून पैसे कमावू शकणार आहात. हा बिझनेस कोणता आहे ते पाहूयात.

हा व्यवसाय मेणबत्ती उत्पादनाचा आहे. यामध्ये तुम्ही घरी बसून काम करू शकता. नंतर तुम्ही त्याचा विस्तार देखील करू शकता. यामध्ये तुम्हाला त्यासंबंधी आवश्यक माहिती मिळवून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय शिकल्यानंतरच करावा, अन्यथा तुमचे उत्पादन खराब होऊ शकतं.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीचे मिळालेले पैसे 'या' ठिकाणी गुंतवा; टॅक्स वाचेल आणि भरभरून रिटर्न्सही मिळतील

कशी बनवायची मेणबत्ती?

मेणबत्ती तयार करण्यासाठी तुम्हाला मेण लागेल. हे मेण तुम्हाला गरम करावं लागणार असून ते 290 अंश ते 380 अंशांवर वितळावावं. यानंतर, मेण मोल्डमध्ये ओतलं जातं आणि ते थंड झाल्यानंतर, ड्रिल मशीनद्वारे किंवा जाड सुईद्वारे एक धागा जोडला जातो. त्यावर गरम मेण ओतून मेणबत्ती तयार केली जाते.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेतून मिळालेल्या पैशांतून सुरु करा 'हा' बिझनेस; महिन्याला कमवाल ६० हजार

मेणबत्ती बनल्यानंतर ती पॅक करा. तुम्ही हा बिझनेस छोट्या जागेतही सुरु करू शकता. पण यासाठी तुम्हाला चांगली पाहिजे. याशिवाय, तयार मेणबत्ती देखील स्टोअर करणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही जागेची व्यवस्था केली पाहिजे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांनी कमवा अजून पैसे, 'हा' साधा सोपा बिझनेस महिलांना करेल मालामाल

किती गुंतवणूकीची गरज असेल?

हा व्यवसाय करण्यासाठी जास्त पैशांची गुंतवणूक लागत नाहीत. थोडे पैसे देऊनही तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही 10,000 ते 50,000 रुपये गुंतवून मेणबत्ती व्यवसाय सुरू करू शकता. मिळालेल्या माहितीनुसार, मेणबत्तीचा व्यवसाय ८ टक्के दराने वाढतोय.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीतून मिळालेल्या पैशांनी सुरू करा 'हा' बिझनेस; प्रत्येक दिवसाला कराल ३ हजारांची कमाई

नफा किती होणार?

मेणबत्ती व्यवसायात खर्च खूप कमी असतो. जर तुम्ही एक मेणबत्तीचे पाकीट 100 रुपयांना विकलं आणि त्यात 20 मेणबत्त्या ठेवल्या तर कोणत्याही सिझनमध्ये तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. यातून होणारा खर्च काढून टाकला तर तुम्ही दर महिन्याला मोठी कमाई करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com