Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेतून मिळालेल्या पैशांतून सुरु करा 'हा' बिझनेस; महिन्याला कमवाल ६० हजार

Ladki Bahin Yojana Business Idea: या माध्यमातून आतापर्यंत अनेक महिलांना याचा लाभ मिळाला आहे. मात्र या मिळालेल्या पैशांमधून तुम्हाला अजून पैसे कमवायचे असतील तर आज आम्ही तुम्हाला एक बिझनेस आयडिया देणार आहोत.
Mukhyamantri Ladki Bahin Yojana Update
Ladki Bahin YojanaSAAM TV
Published On

महाराष्ट्रात लाडकी बहिण योजना सुरु करण्यात आली आहे. या माध्यमातून आतापर्यंत अनेक महिलांना याचा लाभ मिळाला आहे. मात्र या मिळालेल्या पैशांमधून तुम्हाला अजून पैसे कमवायचे असतील तर आज आम्ही तुम्हाला एक बिझनेस आयडिया देणार आहोत. या बिझनेसच्या माध्यमातून तुम्ही कमीत कमी पैसे कमावून दर महिन्याला ५० हजांरांपर्यंत कमाई करू शकता. मुख्य म्हणजे महिलांना हा बिझनेस करण्यासाठी जास्त वेळही द्याला लागणार नाही.

आम्ही तुम्हाला चहाच्या स्टॉलचा बिझनेस करण्याची कल्पना देणार आहोत. यामध्ये तुम्ही फक्त ₹5,000 पासून सुरू करू शकता आणि दरमहा ₹50,000 पर्यंत सहज कमवू शकता. हा व्यवसाय कमी गुंतवणुकीने सुरू होतो आणि जास्तीत जास्त फायदेशीर होऊ शकतो.

चहा ही अशी गोष्ट आहे जी लोक सतत पितात. कॉलेज बाहेर, घराबाहेर, ऑफिसच्या खाली सर्वजण चहा पितात. अशा परिस्थितीत चहाचे स्टॉल उभारण्याचा व्यवसाय खूप फायदेशीर ठरू शकतो.

फक्त 5 हजारांत सुरू करा

चहाच्या स्टॉलचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला खूप कमी गुंतवणूक आवश्यक आहे. तुम्ही तुमचा व्यवसाय कसा चालवता, ठिकाण आणि तुमचं ग्राहकांशी असलेलं नातं आणि चहाची क्वालिटी यावर तुमचा नफा अवलंबून असणार आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Update
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांनी कमवा अजून पैसे, 'हा' साधा सोपा बिझनेस महिलांना करेल मालामाल

चहाचा स्टॉल कसा लावायचा?

चहाच्या स्टॉल लावणं फार कठीण नाही. सुरुवातीला तुम्ही सामान्य कार्ट किंवा काउंटर डिझाइन करू शकता. कार्ट जितकी स्वच्छ आणि आकर्षक असेल तितके तुमच्याकडे ग्राहक आकर्षित होतील. तुम्ही मसाला चहा, दुधाचा चहा, ग्रीन टी, हर्बल टी, कॉफी, समोसा, पकोडा आणि बिस्किटं यांसारखे स्नॅक्स तुमच्या स्टॉलवर ठेवू शकता.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Update
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीतून मिळालेल्या पैशांनी सुरू करा 'हा' बिझनेस; प्रत्येक दिवसाला कराल ३ हजारांची कमाई

किती होईल खर्च?

चहाच्या स्टॉलमध्ये दोन प्रकारचे खर्च असतात - फिक्स्ड आणि वेरिएबल. फिक्स्ड खर्चामध्ये कार्ट खर्च, गॅस, भांडी, स्नॅक कंटेनर आणि स्टँडिंग टेबल यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. याची किंमत अंदाजे ₹ 15,000 ते ₹ 20,000 असू शकते. याव्यतिरिक्त, तुम्हाला FSSAI परवाना देखील मिळवावा लागू शकतो. ज्यामुळे तुमचा व्यवसाय वैध असल्याची खात्री होते. वेरिएबल खर्चामध्ये चहाची पावडर, दूध, साखर, गॅस, स्नॅक्स या गोष्टींचा समावेश होतो.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Update
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीतून मिळालेल्या पैशांनी सुरू करा 'हा' बिझनेस; प्रत्येक दिवसाला कराल ३ हजारांची कमाई

नफा किती होणार

चहाच्या स्टॉलमधून मिळणारा नफा तुम्ही किती चहा विकता आणि त्यासाठी तुम्ही किती किंमत ठेवता यावर अवलंबून असते. तुम्ही दररोज 100 कप चहा विकले तर चहाची किंमत 10 रुपये ठेवून तुम्हाला ₹30,000 पर्यंत कमाई मिळू शकते. तुम्ही चहाची किंमत ₹ 20 असेल तर महिन्याला नफा ₹ 60,000 पर्यंत असू शकतो. तुम्ही कॉफी, ग्रीन टी किंवा स्नॅक्सही विकत असाल तर तुमचे उत्पन्न आणखी वाढू शकते. अशा प्रकारे, तुम्ही चहाच्या स्टॉलमधून ₹50,000 ते ₹60,000 इतके मासिक उत्पन्न सहज कमवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com