Investment: बायकोच्या नावे फक्त १००० रूपये गुंतवा; २ लाखांहून अधिक रक्कम मिळवा

Smart Investment: गृहिणींकडे नियमित उत्पन्नाचा स्रोत नसतो, त्यामुळे बऱ्याचजणी गुंतवणुकीपासून दूर राहतात. परंतु, दरमहा ₹1000 गुंतवूनही मोठी बचत करता येऊ शकते.
Investment Tips
Investment TipsSaam Tv
Published On

गृहिणींकडे नियमित उत्पन्नाचा स्रोत नसतो, त्यामुळे बऱ्याचजणी गुंतवणुकीपासून दूर राहतात. परंतु, दरमहा फक्त ₹500 ते ₹1000 गुंतवूनही भविष्यासाठी मोठी बचत करता येऊ शकते. खाली काही सोपे, सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय दिले आहेत. ३ इन्व्हेस्टमेंट प्लान्समधील आपण त्यापैकी एका प्लानमध्ये पैसे गुंतवू शकता. याचा फायदा आपल्याला भविष्यात होईल, तसेच एक मोठी रक्कम हाती येईल.

पीपीएफ

पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. पीपीएफमध्ये आपल्याला किमान ५०० रूपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रूपये जमा करता येतात. सध्या यावर आपल्याला ७.१ टक्का व्याजदर मिळेल. तुम्हाला १५ वर्षे सतत गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर आपल्याला व्याजासकट रक्कम मिळेल. जर आपण १५ वर्षांसाठी दरमहा १००० रूपयांची गुंतवणूक केली. तर, एका वर्षात १२ हजार रूपये आणि १५ वर्षात १,८०,००० रूपये जमा होती. यावर तुम्हाला १,४५,४५७ रूपये व्याज मिळेल. मॅच्युरिटीवर एकूण ३,२५,४५७ रूपये मिळतील.

Investment Tips
PM Modi: आयफेल टॉवरहून उंच पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन; २ वंदे भारत ट्रेनलाही दाखवला हिरवा झेंडा

एसआयपी

दुसरी गुंतवणुकीची पद्धत म्हणजे एसआयपी. याद्वारे म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवले जातात. आपण यात जितका जास्त वेळ गुंतवणूक कराल तितका जास्त तुम्हाला फायदा होईल. एसआयपीवर १२ टक्के व्याज मिळते. जर आपण नियमित १००० रूपये गुंतवत असाल तर, १५ वर्षात १,८०,००० रूपये गुंतवाल. १२ टक्के दराने ३,२४,५७६ रूपये व्याज मिळेल. अशा प्रकारे १५ वर्षात तुम्हाला ५,०४,५७६ रूपये मिळतील.

Investment Tips
Pune Tragedy: स्कार्फ बांधून लिफ्टमध्ये शिरली, २१ व्या मजला येताच..हिंजवडीतील अभियंता तरूणीचा मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल

आरडी

पोस्ट ऑफिसमध्ये किमान ५ वर्षांसाठी आपण आरडी अकाऊंटमध्ये गुंतवणूक करू शकता. यावर तुम्हाला ६.५ % दराने व्याज मिळेल. जर आपण दरमहा १००० रूपये गुंतवाल तर, ५ वर्षात आपल्याला ६०,००० रूपये गुंतवाल. मॅच्युरिटीवर आपल्याला ७०,९८९ रूपये मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com