Silver Rate Today : सोन्यानंतर चांदीचेही दर घसरले, एका दिवसात तब्बल ₹२०,०००ची घसरण;वाचा ताजे भाव

Gold Silver Rate Today News : सणासुदीच्या तोंडावर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून ग्राहकांसाठी खरेदीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. सोन्याच्या दरातही मोठी घट दिसून येत आहे. जाणून घ्या आजचे दर.
Gold Silver Rate Today News
Gold Silver Rate Today NewsSaam Tv
Published On
Summary
  • चांदीच्या दरात मोठी घसरण

  • अवघ्या २३ दिवसांत ८५ हजारांची घट

  • सोन्याचे दरही मोठ्या प्रमाणात कमी

  • आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम

  • खरेदी आणि गुंतवणुकीसाठी योग्य संधी

चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर! सणासुदीच्या तोंडावर चांदीच्या दारात मोठी घसरण झाली आहे. या काळात सोन्यासोबत चांदीची खरेदी देखील होते. त्यामुळे तुम्हाला देखील चांदी खरेदी करायची असल्यास ही सुवर्ण संधी आहे. चांदीच्या दरात तब्बल २० हजारांची घसरण होऊन चांदी २ लाख १६ हजार ३०० रुपयांवर पोहचली आहे.

वर्षाच्या सुरुवातीला २९ जानेवारी २०२६ रोजी सोने आणि चांदीच्या किमतींनी आतापर्यंतचा उच्चांकी स्तर गाठला होता. चांदीची किंमत ४,२०,००० रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. तिथून आता चांदी २० हजारांनी घसरून २ लाख १६ हजार ३०० रुपयांवर पोहचली आहे.

Gold Silver Rate Today News
Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल, प्रसिद्ध मंदिराकडे जाणारा रस्ता बंद; कोणते आहेत पर्यायी मार्ग?

अवघ्या २३ दिवसात चांदीच्या दरात तब्बल ८५ हजार रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या ४० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या कमी कालावधीत मोठी घसरण झाल्याची पहिलीच वेळ असल्याचे सराफ व्यवसायिकांनी म्हटले. अमेरिका व इराण युद्धाचा सोन्या चांदीच्या दरावर झाला असून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीमधील गुंतवणूक कच्चा तेलाबरोबर इतर ठिकाणी वळल्याने घसरण होत असल्याची सराफ व्यावसायिकांनी म्हटले आहे.

Gold Silver Rate Today News
Shocking : भाजप नेत्याच्या मुलाचे सेक्स स्कँडल उघड; २५ हून अधिक मुलींचे शोषण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तसेच सोन्याचा दर देखील एकाच दिवसात ७ हजार ५०० रुपयांनी घसरला आहे. सोन्याचे दर मागच्या दोन आठवड्यापासून सतत घसरताना दिसत आहे. मागच्या २४ दिवसात सोन्याचे दर २४००० पेक्षा जास्त रुपयांनी घसरले आहेत. कालच्या एका दिवसात सोन्याचे दर १० हजारांनी घसरले होते. तर चांदी २२००० रुपयांनी घसरली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा सोन्याचे दर कमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com