Share Marekt Today : शेअर बाजारात 'हिरवळ'; सेन्सेक्स-निफ्टीने घेतली उसळी, कोणते शेअर्स वधारले?

Share Marekt update : शेअर बाजारात 'हिरवळ' दिसत आहे. सेन्सेक्स-निफ्टीने उसळी घेतली आहे. आज कोणते शेअर्स वधारले, जाणून घेऊयात.
शेअर बाजार
Share Market TodaySaam Tv
Published On

नवी दिल्ली : शेअर बाजारात आज बुधवारी सकाळच्या सत्रात हिरवळ दिसत आहे. दोन दिवसानंतर सेन्सेक्सच्या ३० स्टॉक्समध्ये तेजी दिसत आहे. तर निफ्टीही वधारला आहे. बीएसई सेन्सेक्स ९७२ अंकांनी उसळी घेत ७९,५६५ अंकांवर सुरु झाला आहे. एनएसईचा निफ्टी २९६ अंकांनी उसळी घेत २४,२८९ अंकांवर पोहोचला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आज रियल्टी, खासगी बँक, पीएसयू बँकेच्या शेअर्समध्ये तेजी दिसत आहे.

शेअर बाजार दोन दिवसांनी वधारल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये मोठी आशा निर्माण झाली आहे. आशियायी देशातील शेअर बाजारातही तेजी दिसून आली आहे. गिफ्ट निफ्टी २४,१९० स्तरावर व्यवहार करत आहे. अमेरिकेचा शेअर बाजार देखील बुधवारी चांगल्या स्थितीत बंद झाला.

शेअर बाजार
Share Market: अमेरिकेत मंदी,भारतात ब्लॅक मंडे; गुंतवणूकदारांचे लाखो कोटी पाण्यात

चीनी शेअर बाजार देखील वधारताना दिसत आहे. तर जपानचा निक्केई एका टक्क्यांनी घसरला आहे. तर टॉपिक्स ०.३ टक्क्यांनी वधारला आहे. दक्षिण कोरियाचा कोस्पी १ टक्के आणि कोस्कॅडमध्ये १.३ टक्क्यांनी उसळी दिसून आली.

शेअर बाजारात काय घडलं?

सकाळच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स ९७२.३३ अंक म्हणजे १.२४ टक्क्यांनी उसळी घेतली. यामुळे सेन्सेक्स ७९,५६५.४० अंकावर सुरु झाला. एनएसई निफ्टी २९६.८५ अंक म्हणजे १.२४ टक्क्यांनी उसळी घेत २४,२८९.४० अंकावर पोहोचला.

एनएसईचा निफ्टी ग्रीन झोनमध्ये आहे. निफ्टीचा ५० पैकी ४८ शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. तर २ शेअर निचांकी स्तरावर व्यवहार करत आहे. यामध्ये ओएनजीसीचा शेअर ४.६२ टक्क्यांनी वधारला आहे. यानंतर कोल इंडिया, बीपीसीएल, एम अँड एम आणि हीरो मोटोकॉर्पच्या शेअर्समध्ये तेजी दिसत आहे.

शेअर बाजार
Tea Shop Business : चहाचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

इन्फोन्सिस ठरला टॉप गेनर

सेन्सेक्सच्या ३० शेअर्सपैकी २७ शेअर्समध्ये उसळी पाहायला मिळत आहे. तर ३ शेअर्समध्ये घसरण दिसत आहे. शेअर बाजाराचा व्यवहार सुरु होताच इन्फोसिसमध्ये २.३६ टक्क्यांनी उसळी घेतली. त्यामुळे इन्फोसिसचा शेअर्स २६९३ रुपयांवर व्यवहार होत आहे. त्यामुळे हा शेअर सेन्सेक्सचा टॉप गेनर ठरला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com