.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नवी दिल्ली : बजेटच्या एक दिवस आधीच शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. आज शुक्रवारी सेन्सेक्स ७४० अंकांनी उसळी घेऊन ७७,५०० रुपयांवर बंद झाला. निफ्टी २५८ अंकांनी उसळी घेऊन २३,५०८ अंकांवर पोहोचला. या व्यतिरिक्त बँक निफ्टी २७५ अंकांनी उसळी घेऊन ४९,५८७ वर बंद झाला. बजेटआधीच सरकारी शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. रेल्वे आणि संरक्षण विभागाच्या शेअर्सने १० टक्क्यांहून अधिक वेळ तेजी पाहायला मिळत आहे.
बीएसईच्या टॉप ३० शेअरपैकी ६ शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, आयटीसी हॉटेलमध्ये घसरण पाहायला मिळाली. तर बाकीचे २४ शेअरने उसळी घेतली. यात 'एल अँड टी'च्या शेअरने ४.३७ टक्क्यांनी उसळी घेतली. NSE वर टाटा कंज्यूमर, बेल ट्रेंट आणि कोल इंडियाने चांगली उसळी घेतली.
रेल्वे स्टॉकची ज्यूपिटर वॅगनने शेअर १२ टक्के, आरव्हीएनएल ९ टक्के, इरकॉन इंटरनॅशनल ९ टक्क्यांनी उसळी घेतली. या व्यतिरिक्त डिफेन्सच्या बीईएमएलच्या शेअरने ९ टक्के, माझगाव डॉक ६ टक्के आणि इतर शेअर तेजीत पाहायला मिळत आहे. पीएसयू शेअर NHPC, टाटा कंज्यूमर्स, भेल आणि यूपीएल सारख्या शेअरमध्ये ६ टक्क्यांहून अधिक उसळी पाहायला मिळत आहे.
एनएसईवर एकूण आज २,९१९ शेअर ट्रेड झाले. त्यातील २१३० शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. तर ७११ शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. २१ शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले. तर ५८ शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. तर १७१ शेअर अपर सर्किटला आले आहेत.
तिसऱ्यांदा बजेटच्या दिवशी शनिवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार आहे. याआधी १ फेब्रुवारी २०२०, २८ फेब्रुवारी २०१५ रोजी बजेटच्या दिवशी शेअर बाजार सुरु होते. साधारण बजेटच्या दिवशी शेअर बाजार सुरु राहतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.