Share Market Crash : शेअर मार्केटमध्येही घुसला 'व्हायरस'! पहिल्याच दिवशी सेन्सेक्स १२०० अंकांनी आपटला, ही आहेत ४ कारणं...

Stock Market Crash : नववर्षाच्या पहिल्या सोमवारी सेन्सेक्स १,२०० अंकांनी घसरला आहे. शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण झाली आहे. या घसरणीमागील प्रमुख कारणे काय आहेत ते जाणून घ्या..
Share market down
Share market downSaam Tv
Published On

Share Market Crash : भारतीय शेअर बाजारामध्ये आज (६ जानेवारी) मोठी घसरण झाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स १,२०० अंकापेक्षा खाली गेला. तर निफ्टी ४०० अंकांची घसरण होत २३,६०० वर पोहोचला. देशात HMPV (ह्यमन मेटा न्युमो व्हायरस) प्रकरणासह अन्य आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवर पडल्याचे दिसते. इंडिया VIX या निर्देशांकाने आज १३ टक्के उसळी घेतली. तर निफ्टी निफ्टी मेटल इंडेक्स २.६६ टक्क्यांनी घसरला. तर निफ्टी PSU बँक निर्देशांक ३.३५ टक्के आणि निफ्टी ऑटो निर्देशांक १.६८ टक्क्यांनी घसरला.

शेअर मार्केटमध्ये आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरण कशी झाली जाणून घ्या..

१. चीनमध्ये HMPV विषाणूच्या संक्रमणाला सुरुवात झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने या संबंधित तयारीला सुरुवात केली आहे. आजाराच्या कोणत्याही संभाव्य धोक्याला सामोरे जाण्यासाठी भारत तयार आहे असे मंत्रालयाने म्हटले आहे. या प्रकरणाचा परिणाम शेअर मार्केटवर झाला आहे.

२. तिमाही निकालांपूर्वी गुंतवणूकदार सावध झाले आहेत. याशिवाय केंद्रीय अर्थसंकल्प, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) आगामी बैठकीबाबतही अनिश्चितता आहे. तिसऱ्या तिमाहीच्या निकालांवरून कोणतेही नवे संकेत येईपर्यंत बाजार दिशाहीन राहील असे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी म्हटले आहे.

३. आज आशियाई बाजारात १.४ टक्क्यांनी घसरण झाली. अमेरिकी डॉलरची वाढती किंमतीसह कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर दबाव निर्माण झाला आहे. कच्चा तेलाच्या किमती सध्या इतर महिन्यांच्या तुलनेत वाढल्या आहेत. एकूण परिस्थितीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे.

Share market down
Jagdeep Singh: अबब बाबो! दिवसाला ४८ कोटी, या भारतीयानं सर्वाधिक सॅलरीचे सर्वच रेकॉर्ड मोडले!

४. परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसे काढत आहेत. आतापर्यंत जानेवारी २०२५ मध्ये FPI द्वारे ४,२८५ कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. यामुळे भारतीय शेअरमार्केटवर दबाव पडला आहे. एकाप्रकारे, यामुळेही आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केट कोसळले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Share market down
Pyari Didi Yojana: लाडकी बहीणनंतर लाडकी ताई...; महिलांना दरमहिना मिळणार 2500 रुपये, कशी असेल ही योजना?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com