Share Market today : शेअर बाजारात पुन्हा घसरगुंडी; Sensex-निफ्टी रेड झोनमध्ये, कोणते शेअर्स ठरले टॉप लुजर्स?

Share Market today update : शेअर बाजारात पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळत आहे. Sensex-निफ्टीच्या शेअरमध्ये घरसगुंडी पाहायला मिळाली. आज दिवसभरात ५ शेअर टॉप लुजर्स ठरले. वाचा सविस्तर
शेअर बाजारात पुन्हा घसरगुंडी; Sensex-निफ्टी हिरवेगार, कोणते शेअर्स ठरले टॉप लुजर्स?
Share Market TodaySaam Tv
Published On

मुंबई : शेअर बाजारात पुन्हा एकदा घसरगुंडी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सेन्सेक्स १८१.०४ अंकांनी घसरून ७९,७६२.६७ पर्यंत घसरला. तर निफ्टी ५६.५५ अंकांनी घसरून २४,१३२.१० वर पोहोचला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकेचा डॉलर रुपयाच्या तुलनेत ३ पैशांनी घसरून ८५.७८ वर पोहोचला. शेअर बाजारांच्या आकड्यानुसार, परदेशी गुंतवणूकदारांच्या अनेक दिवसांच्या विक्रीनंतर गुरुवारी १,५०६.७५ कोटी रुपयांची शेअरची खरेदी झाली.

शेअर बाजारात पुन्हा घसरगुंडी; Sensex-निफ्टी हिरवेगार, कोणते शेअर्स ठरले टॉप लुजर्स?
Business Idea: नोकरी सांभाळून तुम्ही सुरू करू शकता 'हे' बिझनेस; पगारासोबत मिळू शकतो बंपर कमाई

सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स १८१.०४ अंकांनी घसरून ७९,७६२.६७ वर पोहोचला. एनएसई निफ्टी ५६.५५ अंकांनी घसरून २४,१३२.१० वर पोहोचला. सेन्सेक्सचे ३० कंपन्यांपैकी टेक महिंद्रा, टाटा कंसल्टेंसी सर्व्हिसेज, इन्फोसिस, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, सन फार्मा आणि एचडीएफसी बँकचे शेअर सर्वाधिक तोट्यात दिसले. एनटीपीसी, टाटा मोटर्स, नेस्ले आणि अदानी पोर्ट्सचे शेअर फायद्यात दिसले. शेअर बाजारात शुक्रवारी अमेरिकेचा डॉलर तीन पैशांनी घसरून ८५.७८ रुपयांवर पोहोचला. काल गुरुवारी अमेरिकेचा डॉलर ११ पैशांनी घसरून ८५.७५ रुपयांवर पोहोचला.

शेअर बाजारात पुन्हा घसरगुंडी; Sensex-निफ्टी हिरवेगार, कोणते शेअर्स ठरले टॉप लुजर्स?
Share Market : शेअर बाजार गलपाटला, तरीही गुंतवणूकदार मालामाल; ६२ हजार कोटी कमावले, हे ५ शेअर तेजीत

आज शेअर बाजाराची स्थिती चांगली पाहायला मिळत नाही. आज दुपारी सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये घसरणीसह व्यवहार सुरु आहे. ३० लिस्टेट कंपन्यांचा सेन्सेक्स ०.७७ टक्क्यांनी म्हणजे ६१६.२० अंकांनी घसरून ७९,३२७.५१ वर व्यवहार करत आहे. निफ्टी ०.६६ टक्क्यांनी म्हणजे १६०.५५ अंकांनी घसरून २४,०२८.१० वर व्यवहार करत आहे. दुसरीकडे टाटा मोटर्सचे शेअर देखील चांगली कामगिरी करत आहेत.

शेअर बाजारात पुन्हा घसरगुंडी; Sensex-निफ्टी हिरवेगार, कोणते शेअर्स ठरले टॉप लुजर्स?
Business Ideas: लाडकी बहीण योजनेच्या पैशातून सुरू करा व्यवसाय, 'या' आहेत बेस्ट ५ आयडिया

शेअर बाजार सुरु झाल्यावर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही रेड झोनमध्ये व्यवहार करत होते. पहिल्या सत्रात हीरो मोटोकॉर्प, सिप्ला, डॉक्टर रेड्डी, आयटीसी आणि विप्रोचे शेअरमध्ये घसरण दिसून आली. आज या पाच शेअरचा टॉप लुजर्स शेअर्सच्या यादीत समावेश झाला. आज शेअर बाजारात फ्रंट-रनिंग घोटाळ्याचा परिणाम होणार, अशी शक्यता वर्तवली होती. त्यानंतर सेन्सेक्सचे ३० लिस्टेड शेअर आणि निफ्टीचे ५० वर परिणाम होणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. या घोटाळ्यामुळे आशियाई बाजारातही चढ-उतार पाहायला मिळाला. तर अमेरिकेतील शेअर बाजार देखील तोट्यात बंद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com