BSE Sensex Today : शेअर बाजारात मोठी उचलआपट! १०६२ अंकांनी सेन्सेक्स कोसळला, ७ लाख कोटी बुडाले

Share market Today : शेअर मार्केटमध्ये आज मोठी घसरण झाली. १०६२ अंकांनी सेन्सेक्स कोसळला. तर निफ्टीनंही लोळण घातली.
BSE Sensex Today
BSE Sensex TodaySAAM TV

शेअर बाजारात आज, गुरुवारी मोठा आपटीबार फुटला. निफ्टीत ३४५ अंकांची घसरण होऊन तो २२,००० अंकांच्या खाली आला. तर सेन्सेक्स १०६२ अंकांनी कोसळून ७२,४०४ च्या पातळीवर बंद झाला. या आठवड्याची ही सर्वात मोठी घसरगुंडी ठरलीये. मागील पाच सत्रांत सेन्सेक्स ७५००० अंकांवरून ७२००० अंकांवर आलाय. तर निफ्टीही लोळण घालत आहे. २२७५० वरून २१९५७ अंकांवर आला आहे.

शेअर बाजारात गुरुवारी म्हणजेच ९ मे रोजी मोठी पडझड बघायला मिळाली. बीएसईच्या लिस्टेड टॉप ३० शेअर्सपैकी २५ शेअर्सनी आपटी खाल्ली. फक्त ५ शेअर्समध्ये उसळी पाहायला मिळाली. टाटा मोटर्सचे शेअरमध्ये साधारण दोन टक्के, महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये १.४८ टक्के, एसबीआय शेअर्समध्ये १.२७ टक्के, इन्फोसिस, एचसीएलच्या शेअर्समध्ये किरकोळ वाढ बघायला मिळाली.

BSE Sensex Today
UPI Payment Trend: डिजिटल पेमेंटमुळे लोकांचा वाढला अधिकचा खर्च, फक्त इतक्या लोकांना झाला फायदा; सर्व्हेतून माहिती उघड

शेअर मार्केटमध्ये भूकंप कशामुळं?

शेअर बाजार खुला होताच सुरुवातीला शेअर्समध्ये किरकोळ घसरण झाली होती. मात्र, त्यानंतरच्या नफेखोरीच्या तडाख्यानं बघता बघता सगळंच चित्र पालटून गेलं. शेअर बाजारात मोठी घसरण झाली. विदेशी गुंतवणूकदारांनीही मोठ्या प्रमाणात शेअर्सच्या विक्रीचा सपाटा लावला. तर काही कंपन्यांच्या खराब कामगिरीमुळंही शेअर बाजारात कोसळधार बघायला मिळाली.

७.३ लाख कोटींचं नुकसान

शेअर बाजारातून रग्गड कमाईच्या गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांचे ७.३ लाख कोटी रुपये बुडाले.

BSE Sensex Today
Business Idea: फक्त ५० हजार रुपयांमध्ये सुरू करा 'हा' व्यवसाय; दरमहा होईल बक्कळ कमाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com