Schengen Visa Rule: युरोपला फिरणे होणार आता सोपे; EU शेंजेन व्हिसाचे नियम बदलले; जाणून घ्या

Schengen Visa New Rule: भारतीय नागरिक आता शेंजेन व्हिसासाठी अर्ज करु शकतात. युरोपियन युनियनने सोमवारी याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, भारतीय नागरिक आता नवीन व्हिसा कॅस्डेट व्यवस्थेअंतर्गत त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री आणि पासपोर्ट वॅलिडिटीच्या आधारावर व्हिसासाठी वॅलिडिटी वाढवून घेऊ शकतील.
Schengen Visa Rule
visagoogle

भारतीय नागरिक आता शेंजेन व्हिसासाठी अर्ज करु शकतात. युरोपियन युनियनने सोमवारी याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, भारतीय नागरिक आता नवीन व्हिसा कॅस्डेट व्यवस्थेअंतर्गत त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री आणि पासपोर्ट वॅलिडिटीच्या आधारावर व्हिसासाठी वॅलिडिटी वाढवून घेऊ शकतील.

EU- भारत कॉमन अजेंडा ऑन मायग्रेशन अँड मॉबिलिटी अंतर्गत प्रवास आणि गतिशिलता यासंदर्भात हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • या व्यवस्थेअंतर्गत भारतीय नागरिकांना तीन वर्षांत दोन व्हिसा वापरल्यानंतर दोन वर्षांसाठी शेजेंन व्हिसा दिला जाऊ शकतो.

  • दोन वर्षांच्या व्हिसानंतर पात्र अर्जदारांना पासपोर्टच्या वॅलिडिटीनुसार पाच वर्षांचा व्हिसा मिळू शकतो.

  • या व्हिसा धारकांना वॅलिडिटी काळात व्हिसा- मुक्त नागरिकांसारखेच प्रवास करण्याचा अधिका मिळतो.

Schengen Visa Rule
Petrol Diesel Rate 23nd April 2024: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? जाणून घ्या महाराष्ट्रातील इंधनाचा भाव

शेंजेन व्हिसा

शेंजेन व्हिसा हा शेंगेन झोनमधील देशाच्या दूतवासाद्वारे दिला जातो. या व्हिसासाह तुम्ही शेंजेन झोनमध्ये आणि त्यातील देशांमध्ये प्रवास करु शकता. म्हणजेच शेजेंन झोनमधील २७ देशांपैकी कोणत्याही देशात तुम्ही शेंजेन व्हिसासह प्रवास करु शकता. प्रत्येक देशात जाण्यासाठी तुम्हाला वेगवेगळा व्हिसा काढण्याची गरज नाही. युरोपला जाणाऱ्या पर्यटकांसाठी हा तात्पुरता व्हिसा आहे.

शेजेंन क्षेत्रात कोणते देश आहेत?

ऑस्ट्रिया, बेल्जियम, बल्गेरिया, क्रोएशिया, झेकिया, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आइसलँड, इटली, लॅटव्हिया, लिकटेंस्टीन, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, माल्टा, नेदरलँड, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, पोर्तुगाल, एस. स्लोव्हेनिया, स्पेन, स्वीडन आणि स्विझरलँड या देशांमध्ये तुम्ही शेंजेन व्हिसावर प्रवास करु शकता.

Schengen Visa Rule
Nissan ची जबरदस्त SUV येत आहे, किंमत असेल 6 लाखांपेक्षा कमी? मिळणार जबरदस्त फीचर्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com