Shahid Kapoor: शाहिद कूपरचा जपान ते अबु धाबीपर्यंतचा ट्रॅव्हल प्लान लीक, अभिनेत्याची सुरक्षितता धोक्यात?

Shahid Kapoor Travel Plan Leaked: शाहिद कपूर नेहमी अभिनयामुळे आणि हटके अंदाजाने नेहमी चर्चेत असतो. शाहिद कपूर आता एका नवीन कारणाने चर्चेत आला आहे. शाहिद कपूरचे ट्रॅवल प्लान सोशल मीडियावर लीक झाला आहे.
Shahid Kapoor
Shahid Kapoor Saam Tv

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. शाहिद अभिनयामुळे आणि हटके अंदाजाने नेहमी चर्चेत असतो. शाहिद कपूर आता एका नवीन कारणाने चर्चेत आला आहे. शाहिद कपूरचे ट्रॅव्हल प्लान सोशल मीडियावर लीक झाला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, शाहिद कपूरच्या ट्रॅव्हल प्लानचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये शाहिद कपूर किती दिवस प्रवास करणार आहे. त्याचे पुढच्या काही दिवसातील प्रवासाचे ठिकाण, विमानाचे नाव आणि तो कोणत्या हॉटेलमध्ये राहणार आहे, याची सर्व माहिती या फोटोंमध्ये दिसत आहे. २३ एप्रिलपर्यंतचा शाहिदचा ट्रॅव्हल प्लान लीक झाला आहे. यामध्ये शाहिद कपूरचा जपान ते अबू धाबीपर्यंतच्या सर्व प्रवासाची माहिती होती. या फोटोमध्ये शाहिदचं संपूर्ण शेड्युल लिहलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये शाहिद कपूरच्या प्रवासाची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. या फोटोंमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. यामुळे आता शाहिदच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. एखाद्या अभिनेत्याची वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर व्हायरल होणे हे खूप जास्त असुरक्षिततेचं असल्याचे सांगण्यात येत आहे.

Shahid Kapoor
Vidya Balan: मला शाहरुखसोबत रोमँटिक चित्रपट करायचा आहे; विद्या बालनने बोलून दाखवली मनातील इच्छा

शाहिदच्या या वैयक्तिक माहितीचा गैरवापर केला जाऊ शकतो, असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. एखाद्या अभिनेत्याची वैयक्तिक माहिती अशाप्रकारे व्हायरल हे शाहिदसाठी असुरक्षिततेचे असु शकते, असं सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

शाहिद कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो क्रिती सेनन सोबत तेरी बातो मे ऐसा उल्झा जिया या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट ओटीटी प्लटफॉर्मवर रिलीज झाला असून प्रेक्षकांनी चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे.

Shahid Kapoor
Deepika Padukone: दीपिका ४ महिन्यांची गरोदर, तरीही करतेय 'सिंघम अगेन'चं शुटिंग; फोटो व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com