शाहिद कपूर -क्रिती सेनॉनचा Teri Baaton Main Aisa Ulijha Jiya ओटीटीवर, कुठे पाहायला मिळणार चित्रपट?

Teri Baaton Main Aisa Ulijha Jiya At OTT: जवळपास एका महिन्यानंतर हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांना थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहयला मिळाला नाही. ते आता घर बसल्या कुटुंबासोबत या चित्रपटाचा आनंद घेऊ शकणार आहेत.
Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya
Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Saam Tv

Teri Baaton Main Aisa Ulijha Jiya Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि क्रिती सेनॉनच्या (Kriti Sanon) ‘तेरी बातों मै ऐसा उल्झा जियां’ (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya) चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिससह जगभरामध्ये चांगली कमाई केली. ज्यांना हा चित्रपट थिएटरमध्ये पाहायला मिळाला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

थिएटरनंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला आहे. जवळपास एका महिन्यानंतर हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांना थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहयला मिळाला नाही. ते आता घर बसल्या कुटुंबासोबत या चित्रपटाचा आनंद घेऊ शकणार आहेत. हा चित्रपट कुठे आणि कधी पाहायला मिळणार हे आपण जाणून घेणार आहोत... (Bollywood News Marathi)

‘तेरी बातों मै ऐसा उल्झा जियां’ हा चित्रपट फेब्रुवारी महिन्यात वॅलेंटाइन वीकमध्ये म्हणजे ९ फेब्रुवारीला रिलीज झाला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्यानंतर प्रेक्षक हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्याची वाट पाहत होते. त्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. ‘तेरी बातों मै ऐसा उल्झा जियां’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर ५ एप्रिल रोजी स्ट्रीम झाला. ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने या चित्रपटाचे राइट्स विकत घेतले होते. Amazon प्राइम व्हिडिओने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चित्रपटाच्या स्ट्रीमिंगची अधिकृत घोषणा केली आहे.

'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'च्या कमाईबद्दल सांगायचे झाले तर, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा पार करू शकला नाही. Sacknilk च्या अहवालानुसार, 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे 85 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. दरम्यान, मॅडॉक फिल्मने चित्रपटाची निर्मिती केली आहे. ॲक्शन, रोमान्स आणि कॉमेडीचा जबरदस्त तडका असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना साहने केले आहे. या चित्रपटामध्ये शाहिद आणि क्रिती व्यतिरिक्त बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी देखील काम केले आहे. त्यांच्यासोबत डिंपल कपाडिया आणि राकेश बेदी देखील चित्रपटात दिसले.

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya
Family Star Public Review: कम्प्लिट फॅमिली एन्टरटेन्मेंट..., 'फॅमिली स्टार' प्रेक्षकांना कसा वाटला?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com