जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयमध्ये असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एसबीआयच्या काही सेवा उद्या म्हणजेच 23 मार्च रोजी बंद राहणार आहेत. या सेवांमध्ये नेट बँकिंगचाही समावेश आहे. जाणून घ्या किती वेळ आणि कोणत्या सेवा बंद राहतील?
स्टेट बँक ऑफ इंडियाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. यात सांगण्यात आलं आहे की, इंटरनेट-संबंधित सेवा 23 मार्च 2024 रोजी दुपारी 01:10 ते दुपारी 02:10 दरम्यान उपलब्ध नसणार. माहिती देताना बँकेने सांगितले की, यादरम्यान ग्राहक इंटरनेट बँकिंग, YONO Lite, YONO Business Web आणि Mobile App, YONO आणि UPI या सेवा वापरू शकणार नाहीत. मात्र UPI Lite आणि ATM सेवा वापरता येतील. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
बँकेने सांगितले की, उद्या म्हणजेच 23 मार्च रोजी दिलेल्या वेळेत कोणताही ग्राहक UPI वापरू शकणार नाही. मात्र UPI Lite वापरून पेमेंट केले जाऊ शकते. यासोबतच एखादी व्यक्ती एटीएम मशिनमध्ये जाऊन पैसे काढू शकते. (Latest Marathi News)
आपल्या तिसऱ्या तिमाहीचे रिपोर्टमध्ये एसबीआयने म्हटले होते की, बँकेचे भारतात 81,000+ BC आउटलेटसह 22,400+ शाखा आणि 65,000+ ATM/ADWM चे नेटवर्क आहे. यासह बँकेचे 125 मिलियन ग्राहक इंटरनेट बँकिंग आणि 133 मिलियन ग्राहक मोबाइल बँकिंग सेवेचा वापर करतात. याशिवाय तिसऱ्या तिमाहीत, एसबीआयमध्ये YONO द्वारे 59 टक्के खाती उघडण्यात आली आणि एकूण 7.05 कोटींहून अधिक युजर्स त्यावर नोंदणीकृत आहेत.
ग्राहकांना कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास किंवा कोणतीही माहिती मिळवण्याची आवश्यकता असल्यास बँकेने यासाठी देखील मार्ग उपलब्ध करून दिला आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक अशा कोणत्याही सुविधेसाठी एसबीआयच्या टोल फ्री क्रमांक 1800 1234 आणि 1800 2100 वर कॉल करू शकतात. याशिवाय एसबीआयच्या वेबसाइटवर जाऊनही आपल्याला हवी असलेली माहिती मिळवू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.