SBI चा कर्जधारकांना मोठा झटका; कर्जे महागणार, जास्तीचा EMI भरावा लागणार

SBI Home Loan EMI Increase: स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. स्टेट बँकेचे लोन आता महागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना जास्त ईएमआय भरावा लागणार आहे.
SBI
SBI Saam Tv
Published On

अनेकजण घर खरेदीसाठी, कार खरेदीसाठी किंवा वैयक्तिक कामांसाठी लोन घेतात. बँकामध्ये चांगल्या व्याजदरात कर्ज घेता येते. वेगवेगळ्या बँकाची वेगवेगळी लोन पॉलिसी आहे. यात त्यांचे वेगवेगळे व्याजदर ठरलेले असतात. मात्र, आता स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला झटका बसणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण आढावा बैठकीनंतर काही दिवसांनीच हा निर्णय घेण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तरीही होम लोनवरील व्याजदर वाढवले आहे. यामुळे ग्राहकांना जास्त पैसे भरावे लागणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने १५ जूनपासून १० बेस पॉईंट्स किंवा ०.१ टक्क्यांनी कर्ज दराची मार्जिनल कॉस्ट वाढवली आहे. एसबीआयच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारच्या कर्जाचा ईएमआय वाढणार आहे. यामुळे तुम्हाला आधीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागणार आहे.

एसबीआयने एक वर्षाचा एमसीएलआर (MCLR) ८.६५ टक्क्यांवरुन ८.७५ टक्के वाढवला आहे. एक महिना ते तीन महिन्यांच्या एमसीएलआरवर ८.२० टक्क्यांवरुन ८.३० टक्के वाढवला आहे. सहा महिन्यांचा एमसीएलआर ८.५५ टक्क्यांवरुन ८.६५ टक्के झाला आहे. दोन वर्षांसाठीचा एमसीएलआर ८.८५ टक्के झाला आहे. तर तीन वर्षांचा एमसीएलआर ८.८५ टक्क्यांवरुन ८.९५ टक्के झाला आहे.

SBI
Government Scheme For Women: एकदा गुंतवणूक करा अन् दोन वर्षात लखपती व्हा; केंद्र सरकारची महिलांसाठी खास योजना, वाचा सविस्तर

गृहकर्ज आणि वाहन कर्जासह अनेक किरकोळ कर्जांवरील एमसीएलआर वाढला आहे. रेपो रेट किंवा ट्रेझरी बिल यांच्याशी निगडीत कर्ज घेणाऱ्या ग्राहकांवर MCLR वाढीचा काहीही परिणाम होणार नाही. बँक आपल्याला दोन प्रकारचे कर्ज देते.

SBI
नवी Bajaj Pulsar N160 आहे दमदार; चिखलात आणि निसरड्या रस्त्यावर धावेल भन्नाट, जाणून घ्या किंमत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com