नवी Bajaj Pulsar N160 आहे दमदार; चिखलात आणि निसरड्या रस्त्यावर धावेल भन्नाट, जाणून घ्या किंमत

Bajaj Auto ने Pulsar 160 या बाईकमध्ये नवीन फीचर्स देली आहेत. यासोबतच बजाजने पल्सर 125, पल्सर 150 आणि पल्सर 220F मध्ये नवीन ग्राफिक्ससह आणि फीचर्स अपडेट केलेत.
नवी Bajaj Pulsar N160 आहे दमदार; चिखलात आणि निसरड्या रस्त्यावर धावेल भन्नाट, जाणून घ्या किंमत
Bajaj Pulsar N160bike wale

बजाज ऑटोने भारतातील बाईकच्या मार्केटमधील शर्यतीत टिकण्यासाठी नवीन बाईकसह काही वाहनांमध्ये कमालीचे बदल केली आहेत. बजाज कंपनीची लोकप्रिय ठरलेली प्लसर बाईकमध्ये नवी फीचर्सचा समावेश करता पुन्हा एकदा ग्राहकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बजाज ऑटोने त्यांच्या लोकप्रिय पल्सर बाईकचा N160 चा एक नवीन प्रकार लॉन्च केलाय. इतकंच नाही तर कंपनीने Pulsar 125, Pulsar 150 आणि Pulsar 220F मध्ये नवीन ग्राफिक्स आणि फीचर्सदेखील अपडेट केलेत.

आता या सर्व बाइक्समध्ये तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीची सुविधा मिळेल. या बाईक्सला तुम्ही तुमचा स्मार्टफोन कनेक्ट करू शकता. राइडिंग करताना तुम्हाला कॉल आणि एसएमएस अलर्टचीही माहिती मिळेल. या नव्या फीचर्समुळे बाईक चालवण्याचा एक वेगळाच आनंद राईडरला मिळेल, असा दावा कंपनीकडून केला जात आहे.

बजाज पल्सर सिरीजच्या किमती (एक्स-शोरूम, दिल्ली)

Bajaj Pulsar N160: 1,39,693 रुपये

Bajaj Pulsar 125 carbon fibre single seat: 92,883 रुपये

Bajaj Pulsar 150 Single Disc: 1,13,696 रुपये

Bajaj Pulsar 220F: 1,41,024 रुपये

बाईकमध्ये बसवलेले डिजिटल स्पीडोमीटर टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनला देखील सपोर्ट करतील. म्हणजेच आता नेव्हिगेशन पाहण्यासाठी तुम्हाला फोनकडे पुन्हा पुन्हा पाहण्याची गरज नाहीये. तसेच नवीन पल्सर N160 मध्ये शॅम्पेन गोल्ड 33mm USD फोर्क्स मिळतील, जे उत्तम हाताळण्यास सोपे आणि उत्कृष्ट राइडिंग अनुभव देईल.

सर्वात भारी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन Pulsar N160 बाईक कोणत्याही रस्त्यावर धावण्यास सज्ज आहे. साधरण बाईक कोणत्या रस्त्यावर चांगली चालेल याची शाश्वती देता येत नाही. परंतु बजाज ऑटोने नवीन Pulsar N160 मध्ये मल्टी राइड मोड्स दिलेत. यामुळे तुम्ही चिखलातून बाईक आणत आहात किंवा पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यांवरुन राइड करत आहात, तरीही बाईक उत्तम प्रतिचा वेग आणि उत्कृष्ट राइडिंगचा अनुभव येईल.

बाइक्समध्ये रोड मोड मानक म्हणून सेट केलेत. बाईक शहर आणि महामार्गानुसार ट्यून करण्यात आलीय. पावसात ही बाईक चालवताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, असा दावा कंपनीकडून करण्यात आलाय. रस्त्याची परिस्थिती काहीही असो, तरीही बाईक चालवताना तुमचा हाताळणीचा अनुभव सारखाच असेल शिवाय खडकाळ रस्त्यावरही बाईकवरील तुमचं नियंत्रण चांगलेच राहील. तसेच बाईकमध्ये स्थिर ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आलीय.

Bajaj Pulsar N160 च्या इंजिनमध्ये यात 164.82cc, ऑइल कूल्ड इंजिन आहे जे 16PS ची पॉवर जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. यात डिस्क ब्रेकची सुविधा आहे. बाईकमध्ये ड्युअल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) देण्यात आलीय. ज्यामुळे वाहनांवर पटकन नियंत्रण करता येते. हे इंजिन सर्व प्रकारच्या हवामानात चांगले चालेल, असा कंपनीने केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com