

एखाद्या व्यवसायासाठी किंवा आपात्कालीन परिस्थितीत अनेक आर्थिक अडचणी येतात. अशावेळेस लोक बॅंकाकडून कर्ज काढण्याचा निर्णय घेतात. पण कर्जाची परतफेड करताना अनेकांना नाकीनऊ येतात. अशातच RBI बॅंकेने कर्जदारांना दिलासा दिला आहे. यामध्ये कर्ज घेणाऱ्यांना हप्त्यांमध्ये मदत मिळेल. यात नेमकी काय मदत मिळेल हे जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत नक्कीच वाचा.
आतापर्यंत कर्जाच्या हप्त्यांमध्ये सवलत हवी असल्यास ग्राहकांना स्वत: बॅंकेत अर्ज करायला जावं लागत होतं. त्यानंतर बॅंक तपासणी करुन मदत देत होती. पण नव्या नियमांनुसार ही प्रक्रिया पूर्णपणे बदलेली आहे. आता तुम्हाला गरजेच्या किंवा पूर, भूकंप, चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत बॅंका तुम्हाला हप्त्याची (EMI)मुदत वाढवून देणार आहेत.
आपत्तीची ओळख National Disaster Response Force (NDRF) किंवा State Disaster Response Force (SDRF) यांच्या निकषांवर केली जाईल. एकदा एखादा भाग आपत्तीग्रस्त घोषित झाला की, बॅंकाना ४५ दिवसांच्या आत मदत प्रक्रिया सुरु करावी लागेल. यामध्ये खातं स्टॅंडर्ड आणि अॅक्टीव्ह असणं आवश्यक आहे. ३० दिवसांपेक्षा जास्त हप्ते थकलेले असतील तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही. तसेच एखाद्या ग्राहकाला ही सवलत नको असेल तर तो १३५ दिवसांच्या आत बॅंकेकडे अर्ज करुन नकार देऊ शकतो.
1. कर्जदारांना EMI भरण्यासाठी जास्त वेळ मिळणार आहे.
२. काही दिवसांसाठी हप्ते पुढे ढकलले जातील.
३ कर्जदारांचे Restructuring होईल.
४. कोणत्याही आपत्तीच्या काळातमध्ये उत्पन्नावर परिणाम झालेल्या नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.