Raja Shivaji Movie: 'राजा शिवाजी' सिनेमामुळं उलगडला इतिहास; छत्रपती शिवरायांच्या जवळच्या व्यक्तींबद्दल माहितीये का?

Sakshi Sunil Jadhav

राजा शिवाजी चित्रपटाची कमाई

सध्या बॉक्स ऑफीसवर राजा शिवाजी हा चित्रपट धुमाकुळ घालतोय. त्याची आत्तापर्यंतची कमाईही ४०.३४ कोटी रुपये झाली. हा आकडा वाढत चालला आहे.

raja shivaji movie

महाराजांचे मावळे

छत्रपती शिवाजी महाराजांभोवती अनेक धाडसी निष्ठावान आणि पराक्रमी मावळे होते. त्यांनी स्वराज्याच्या उभारणीत मोठा वाटा उचलला.

raja shivaji movie

चित्रपटातील महत्वपूर्ण व्यक्ती

राजा शिवाजी सिनेमामुळे या सर्व ऐतिहासिक व्यक्तींचे योगदान पुन्हा लोकांसमोर येत आहे. पुढील माहितीत आपण राजा शिवाजी या रितेश देशमुख दिग्दर्शित चित्रपटातील अधोरेखित झालेल्या इतिहासातील महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत.

chhatrapati shivaji maharaj history

संभाजी शहाजी भोसले

संभाजी शहाजी भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू होते. ते शहाजी राजांचे पहिले पुत्र होते. त्यांनी लहानपणापासून युद्धाच्या कला आत्मसात केल्या होत्या.

sambhaji shahaji bhosale

लखुजीराव जाधव

लखुजीराव जाधव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा होते. ते एक पराक्रमी सरदार होते आणि त्यांच्याच कुटुंबामुळे शिवाजी महाराजांना शौर्य आणि नेतृत्वाचे संस्कार मिळाले.

lakhuji jadhav history

जिवाजी महाले

जिवाली महाले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते. अफजलखानाच्या वधाच्या वेळी जिवाजी महाले यांनी महाराजांचे प्राण वाचवले होते.

jivaji mahale story

पंताजी गोपीनाथ बोकील

पंताजी गोपीनाथ बोकील हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील आणि मुत्सद्दी होते. त्यांनी स्वराज्याच्या राजकारणात आणि तहांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

pantaji gopinath bokil

NEXT: Raja Shivaji: राजा शिवाजी चित्रपटाचं शूटिंग महाराष्ट्रात कुठे झालंय? ही ४ ठिकाणं तुम्हाला माहितीयेत का?

Riteish Deshmukh historical film
येथे क्लिक करा