Kotak Mahindra Bank News: RBI चा महत्वाचा निर्णय! कोटक बँकेत तुमचं खातं सुरक्षित आहे? जाणून घ्या

RBI's Action on Kotak Mahindra Bank: भारतीय रिझर्व्ह बँकेने खाजगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई केली आहे. कोटक बँकेने ऑनलाइन किंवा मोबाईल बँकिगद्वारे कोणतेही नवे ग्राहक जोडू नयेत. तसेच क्रेडिट कार्ड देण्याबाबत प्रतिबंध लावले आहेत.
The Reserve Bank of India has taken action against the private sector Kotak Mahindra Bank
The Reserve Bank of India has taken action against the private sector Kotak Mahindra Banksaam Tv

भारतीय रिझर्व्ह बँकेने खाजगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई केली आहे. कोटक बँकेने ऑनलाइन किंवा मोबाईल बँकिगद्वारे कोणतेही नवे ग्राहक जोडू नयेत. तसेच क्रेडिट कार्ड देण्याबाबत प्रतिबंध लावले आहेत. यामुळे बँकेच्या ग्राहकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या कारवाईचा परिणाम बँकेतील खातेधारकांवर होणार का? आता ग्राहक कोटक महिंद्रा बँकेचे क्रेडिट कार्डचे नुतणीकरण करु शकतील का? जर तुम्हाला बँकेत नवीन खाते उघडायचे असल्यास ते उघडता येईल का? असे अनेक प्रश्न ग्राहकांच्या मनात आहेत.

कोटक महिंद्रा बँकेत ज्या ग्राहकांनी ऑनलाइन खाती उघडली. त्यांना रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचा कोणताही फटका बसणार नाही. ग्राहक त्यांने खाते इंटरनेच बँकिंग आणि मोबाईल बँकिंगद्वारे वापरु शकतात.

आरबीआयच्या निर्णयाचा परिणाम बँकेतील कोणत्याही खात्यावर होणार नाही. बँकेने निवेदनात म्हटले आहे की, बँक आपल्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड, मोबाइल आणि नेट बँकिंगसह इतर सर्व्हिस देण्याचे आश्वासन देते.

तुम्ही कोटक 811 डिजिटल खाते उघडू शकता का?

कोटक बँक 811 हे डिजिटल अकाउंट उघडण्यासाठी वापरले जाते. याचा वापर करुन ग्राहक घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने बँकेत खाते उघडत होते. मात्र, आता आरबीआयच्या निर्णयानंतर नवीन ग्राहक कोटक 811उकाउंट उघडू शकणार नाहीत.

बँकेच्या क्रेडिट कार्डचा ग्राहकांवर परिणाम होईल का?

कोटक बँकेवर लादलेल्या सध्याच्या निर्बंधाचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होऊ नये. मात्र, क्रेडिच कार्ड नुतणीकरण करायचे असल्यास बँकेकडून सर्व माहिती घ्यावी लागणार नाही. कोटक बँकेने दिलेल्या माहितीनुसार, क्रेडिट कार्ड युजर्संना कार्ड नुतणीकरण करताना कोणतीही अडचण येणार नाही.

The Reserve Bank of India has taken action against the private sector Kotak Mahindra Bank
WhatsApp: ...तर व्हॉट्सअॅप भारतातून निघून जाईल; 'मेटा' कंपनीने दिल्ली हायकोर्टात स्पष्टच सांगितलं

आरबीआयची कोटक बँकेवर कारवाई

भारतीय रिझर्व्ह बँकेने कोटक महिंद्रा बँकेच्या काही सेवांवर बंदी घातली आहे. आरबीआयने सांगितले की, कोटक महिंद्रा बँकेच्या डिजिटल ऑपरेशन्ससंबंधित काही उणीवा जाणवल्या आहेत. त्यामुळेच बँकेवर कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने बँकेला ऑनलाइन आणि मोबईल बँकेद्वारे नवीन ग्राहकांचे अकाउंट उघडू नये, असे सांगितले आहे. तसेच बँकेला नवीन क्रेडिट कार्ड जारी न करण्यास सांगितले आहे.

The Reserve Bank of India has taken action against the private sector Kotak Mahindra Bank
Petrol Diesel Rate 26th April 2024: पेट्रोल- डिझेलच्या नव्या किंमती जाहीर; जाणून घ्या मुंबई-पुण्यासह प्रमुख शहरातील भाव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com