Kotak Bank : आरबीआयची कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई; Online कस्टमर खातं उघडणं, Credit Card सेवेवर आणले निर्बंध

RBI Bank Action On Kotak Bank : भारतीय रिझर्व्ह बँकेने कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई केलीय. आरबीआयच्या कारवाईनंतर आता नवीन ग्राहकांना क्रेडिट कार्ड मिळणार नाहीये.
RBI Restrictions On  Kotak Mahindra Bank
RBI Restrictions On Kotak Mahindra BankGoogle

RBI Restrictions On Kotak Mahindra Bank

भारतीय रिझर्व्ह बँकने कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई केलीय. आता कोटक बँक नवीन ग्राहक जोडू शकत नाही. तर नवीन क्रेडिट कार्डही ग्राहकांना देऊ शकत नाही. पण ज्या ग्राहकांकडे आधीपासून क्रेडिट कार्ड आहेत, त्यांना बँक सेवा देत राहणार असल्याची माहिती आरबीआयकडून देण्यात आलीय. दरम्यान आयटी जोखीम व्यवस्थापन आणि माहिती सुरक्षा ऑपरेशन्समधील त्रुटींमुळे आरबीआयने ही कारवाई केली आहे.

RBI ने कारवाई का केली?

IT जोखीम व्यवस्थापन आणि माहिती सुरक्षा ऑपरेशन्समधील त्रुटींमुळे RBI ने ही कारवाई केलीय. आरबीआयच्या मते, कोटक बँक तिच्या वाढीसह आयटी प्रणाली सुधारण्यात अपयशी ठरलीय. रिझर्व्ह बँकेने २०२२ आणि २०२३ या वर्षांसाठी बँकेच्या आयटी तपासणीमुळे उद्भवलेल्या चिंतेनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे आरबीआयने म्हटलंय.

काय म्हणाले RBI ?

"आयटी इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, युजर ऍक्सेस मॅनेजमेंट, व्हेंडर रिस्क मॅनेजमेंट, डेटा सिक्युरिटी आणि डेटा लीक प्रतिबंधक स्ट्रॅटेजीज, बिझनेस कंटिन्युटी आणि क्रायसिस पश्चात रिकव्हरीच्या प्रयत्नांमध्ये गंभीर कमतरता आणि नियमांचे उल्लंघन आढळून आले. सलग दोन वर्षे, बँकेतील आयटी जोखीम आणि माहिती सुरक्षा ऑपरेशन्स नियामकात मार्गदर्शक तत्त्वांनुसार कमतरता दिसून आली.

काय होणार परिणाम

कोटक महिंद्रा बँकेला आता त्यांच्या ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंगद्वारे नवीन ग्राहक जोडणे आणि नवीन क्रेडिट कार्ड जारी करता येणार नाहीये. मात्र बँक तिच्या विद्यमान क्रेडिट कार्ड धारकांसह ग्राहकांना सेवा प्रदान करेल. शेअर बाजार बंद झाल्यानंतर कोटक बँकेसंदर्भात बातमी आलीय. उद्या गुरुवारी या बँकिंग कंपनीच्या शेअर्सवर लक्ष असेल. बाजार तज्ज्ञांच्या मते, उद्या या शेअरमध्ये घसरण दिसून येऊ शकते.

RBI Restrictions On  Kotak Mahindra Bank
RBI Action : महाराष्ट्रातील बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; कारण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com