सध्याच्या सोशल मीडियाच्या या जगात व्हायरल झालेल्या फेक न्यूजचा महापूर आला आहे. ज्यांचा सत्याशी काहीही संबंध नाही, अशा बातम्याही लोक सत्य मानतात. अनेक सोशल मीडिया पोस्टमध्ये, विशिष्ट हेतूने खोटे दावे केले जातात. ज्याची वस्तुस्थिती वस्तुस्थिती तपासल्यानंतर समोर येते.
अनेक व्हायरल बातम्यांचा प्रभाव इतका असतो की लोक विविध प्रकारच्या कमेंट करू लागतात. अशीच एक बातमी 100 रुपयांच्या जुन्या नोटांबाबत व्हायरल होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये असा दावा केला जात होता की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 100 रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. तसेच आता या नोटांच्या माध्यमातून व्यवहार करता येणार नाही. आरबीआयने 31 मार्च 2024 पर्यंत जुन्या 100 रुपयांच्या नोटा बदलून घेण्याचे निर्देश दिले आहेत. (Latest Marathi News)
याची वस्तुस्थिती तपासली असता हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे आढळून आले. जुनी नोट ही पूर्णपणे कायदेशीर वैद्यआहे आणि आरबीआयची याची नोटबंदी करण्याची कोणतीही योजना नाही. आरबीआयनेही याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.
फॅक्ट चेकमध्ये कोणती माहिती आली समोर?
News24 ने याबाबत फॅक्ट चेक केले आहे. News24 ने याबाबत संशोधन केले असता अशी कोणतीही बातमी त्यांना आढळून आली नाही. त्यांना आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर सर्च करूनही यासंदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. आरबीआयच्या जुन्या प्रेस रिलीझमध्ये 100 रुपयांच्या जुन्या नोटा वैध राहतील असे म्हटले आहे. जुन्या नोटा बदलण्याबाबत बँकेने काहीही सांगितलेले नाही आणि सोशल मीडियावर केला जात असलेला दावा पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 100 रुपयांच्या सर्व जुन्या आणि नव्या नोटा चलनात राहतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.