RBI Account Portability: अकाउंट नंबर तोच राहणार पण बँक बदलणार; RBI नवीन सुविधा करणार सुरु

Portable Bank Account Servive by RBI: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ग्राहकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आता तुम्ही तुमचा अकाउंट नंबर तोच ठेवून बँक बदलू शकतात.
RBI Account Portability
RBI Account PortabilitySaam tv
Published On
Summary

RBI चा मोठा निर्णय

आता अकाउंट नंबर न बदलता येणार दुसऱ्या बँकेत उघडता येणार अकाउंट

बँक पोर्टेबिलिटी सुविधा सुरु करणार

देशातील कोट्यवधी लोकांचे बँकेत अकाउंट आहे. बँक अकाउंट असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता ग्राहक काही मिनिटांत त्यांची बँक बदलू शकतो. जसा आपण मोबाईल नंबर बदलतो तसेच बँकदेखील बदलण्याचा ऑप्शन तुमच्याकडे असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला अकाउंट नंबर तोच असणार आहे. फक्त तुमची बँक बदलणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच बदल करण्याच्या तयारीत आहेत.

RBI Account Portability
Bank Holiday In March 2026: पुढच्या आठवड्यात सलग ४ दिवस बँका बंद; गुढी पाडव्याआधीच उरकून घ्या बँकेची कामं

RBIच्या प्रस्तावित पेमेंट्स विजन 2028 अंतर्गत बँक अकाउंट पोर्टेबिलिटी लागू केली जाऊ शकते. याचाच अर्थ असा की, ग्राहक आता त्यांच्या सध्याचा अकाउंट नंबर तसाच ठेवून बँक मात्र बदलू शकतात.त्यामुळे ग्राहकांना खूप फायदा होणार आहे.

काय आहे बँक अकाउंट पोर्टेबिलिटी?

सध्या जर तुमचे एका बँकेत अकाउंट असेल आणि दुसऱ्या बँकेत उघडायचे असेल तर ही प्रोसेस खूप किचकट आहे. आधीच्या बँकेतील अकउंट बंद करावे लागते त्यानंतर नवीन बँकेत अकाउंट उघडावे लागते. यानंतर सॅलरी अकाउंट, गुंतवणूक, सबस्क्रिप्शन आणि सरकारी योजनांमध्ये नवीन अकाउंट नंबर अपडेट करावा लागतो. यामुळे ग्राहकांना खूप त्रास होतो. आता यासाठीच अकाउंट पोर्टेबिलिटी सुरु केली जाणार आहे.

या नवीन व्यवस्थेअंतर्गत तुमचा अकाउंट नंबर एक युनिव्हर्सल फायनान्शियल आयडी म्हणून काम करणार आहे. हा कोणत्याही बँकेशी जोडलेला नसणार आहे. तुम्ही नंबर न बदलता बँक बदलू शकता. नवीन बँकेत त्याच अकाउंट नंबरला सुरु करु शकतात.

यामुळे तुम्हाला वारंवार बँकेच्या फेऱ्या माराव्या लागणार नाही. तुमचे सर्व काम ऑनलाइन होईल. यामुळे ग्राहकांना खराब सर्व्हिस आणि जास्तीचे चार्ज याचा त्रास सहन करावा लागणार नाही. ग्राहक त्यांच्या मर्जीप्रमाणे नवीन बँक निवडू शकतात आणि त्यात पोर्ट करु शकतात.

RBI Account Portability
Bank Holiday: रामनवमीनिमित्त उद्या बँका बंद राहणार का? बँकेत जाण्यापूर्वी एकदा वाचाच

फायदे

बँक बदलल्यावर पेमेंट्स कसे होणार असा प्रश्न अनेकांना पडतो. परंतु आता बँक बदलल्यानंतर तुमचे ईएमआय एसआयपी आणि बिल पेमेंट सर्वकाही नवीन बँकेत ट्रान्सफर केले जाईल. तुम्हाला यासाठी वेगवेगळी माहिती देण्याची गरज नाही. तुमच्या सर्व सरकारी योजना, ऑटो डेबिट गोष्टींमध्ये नवीन अकाउंट लिंक होईल.

RBI Account Portability
Bank Holiday: राज्यात बँकांना सलग ६ दिवस सुट्ट्या; महाराष्ट्रात काय स्थिती? वाचा सुट्ट्यांची यादी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com