Ransomware Attack On Banks: ३०० बँकांची UPI, ATM सेवा तात्पुरती बंद; सर्व्हरमध्ये घुसला व्हायरस; तुमचं UPI पेमेंट सुरु आहे का?

Ransomware Attack On Banks: भारतातील तब्बल ३०० बँकावर रॅनसमवेअर व्हायरसने हल्ला केला आहे. त्यामुळे युपीआय पेमेंटवर परिणाम झाला आहे. ३०० बँकाच्या पेमेंट सेवा बंद करण्यात आल्या आहेत.
Ransomware Attack On Banks
Ransomware Attack On BanksSaam Tv
Published On

देशातील ३०० हून अधिक बँकाच्या सर्व्हरमध्ये रॅनसमवेअर व्हायरसने हल्ला केला आहे. त्यामुळे भारतातील अनेक बँकाच्या पेमेंट सेवेवर परिणामझाला आहे. या व्हायरसमुळे स्थानिक बँकाना आपली पेमेंट प्रक्रिया पूर्णपणे थांबवावी लागली आहे.

Ransomware Attack On Banks
Income Tax Return: ITR फाइल करण्याची शेवटची तारीख! आजच अर्ज करा अन्यथा भरावा लागेल दंड

मिळालेल्या माहितीनुसार, C-Edge Technologies नावाची कंपनी जवळपास ३०० पेक्षा जास्त बँकांना सर्व्हिस पुरवते. याच कंपनीवर सायबर हल्ला झाला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पेमेंट सेवा थाबण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.C-Edge Technologies या कंपनीने याबाबत माहिती दिली आहे.

देशातील पेमेंट सेवेवर एनसीपीआय म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लक्ष ठेवत असते. सायबर हल्ला झाल्यानंतर NCPI ने यासंदर्भात नोटिफिकेशन जारी केले होते.यात सांगण्यात आले आहे की, काही काळासाठी C-Edge Technologies ला बँकाचे पेमेंट सर्व्हर रोखण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता या बँकाच्या ग्राहकांना युपीआय पेमेंट सेवेचा वापर करता येणार नाही.

ग्राहकांच्या सुरक्षेसाठी C-Edge Technologies कंपनीची सुविधा बंद करण्यात आले आहे. या व्हायरसचे निरकारण झाल्यानंतर सुविधा पुरवली जाणार आहे. या व्हायरसमुळे ३०० स्थानिक बँकावर परिणाम झाला आहे.

Ransomware Attack On Banks
Share Market Prediction: जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोणते शेअर्स चमकणार? कोणत्या स्टॉक्सने तगडी कमाई होईल?जाणून घ्या

मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामुळे युपीआय (UPI) पेमेंटवर जास्त परिणाम झाला नाही. या बँकामध्ये ०.५ टक्के ग्राहक युपीआय पेमेंट वापरतात. सायबर हल्ल्यामागचे कारण शोधण्यासाठी NPCI ने कारवाई सुरु केली आहे.

Ransomware Attack On Banks
Whatsapp: आता तुमचे मेसेज राहणार अधिक सेफ आणि गोपनीय, Whatsapp ने सुरू केली राष्ट्रीय सुरक्षा मोहीम

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com