Paytm : छोट्या दुकानदारांनाही स्वीकारता येणार कार्ड पेमेंट; पेटीएमकडून NFC कार्ड साऊंडबॉक्स लाँच

paytm payment sound box : छोट्या दुकानदारासांठी आनंदाची बातमी. आता छोट्या दुकानदारांनाही स्वीकारता कार्ड पेमेंट येणार आहे. यासाठी पेटीएमने NFC कार्ड साऊंडबॉक्स लाँच केले आहे.
छोट्या दुकानदारांनाही स्वीकारता येणार कार्ड पेमेंट; पेटीएमकडून NFC कार्ड साऊंडबॉक्स लाँच
Paytm Payment BankSaam Tv
Published On

मुंबई : पेटीएमने भारतात 'पेटीएम एनएफसी कार्ड साउंडबॉक्स' लाँच करण्याची घोषणा केली आहे. या सुविधेचा साऊंडबॉक्समुळे छोट्या दुकानदारांना मोठा फायदा होणार आहे.

एनएफसी कार्ड साउंडबॉक्स लाँच करत पेटीएमने छोट्या दुकानदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता छोट्या दुकानदारांना सुरक्षित एनएफसी कार्ड-रीडिंग तंत्रज्ञान वापरण्याची सुविधा मिळणार आहे. या सुविधेमुळे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड आणि युपीआयसह पेमेंट स्वीकारता येणार आहे. आता ग्राहक कार्ड टॅपकरून किंवा क्यूआर कोड स्कॅन करून पैसे देऊ शकतात.

छोट्या दुकानदारांनाही स्वीकारता येणार कार्ड पेमेंट; पेटीएमकडून NFC कार्ड साऊंडबॉक्स लाँच
Paytm चा मोठा निर्णय! युजर्सना येणार पॉपअप मेसेज, UPI वापरण्यासाठी करावे लागणार हे महत्त्वाचे काम

१० दिवसांपर्यंत सुधारित आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरी या साऊंडबॉक्सला असणार आहे. छोटे व्यापारी वारंवार चार्जिंग न करता पेटीएम एनएफसी कार्ड साउंडबॉक्सचा लाभ घेऊ शकतात. त्वरित ऑडिओ पुष्टीकरण आणि व्यवहाराच्या रकमेसाठी डिस्प्ले स्क्रीनसह त्याच्या कोर फीचर्स देखील असणार आहे. नाविन्य व्यापाऱ्यांना त्यांचा दैनंदिन व्यवहार सुलभ होणार आहे.

पेटीएम
paytm Saam tv

पेटीएमचे प्रवक्ते म्हणाले, "आम्ही भारतातील छोट्या व्यापाऱ्यांना नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहोत. सर्व प्रकारच्या पेमेंट स्वीकारण्यासाठी सुलभ किंमतीत मिळणा आहे. 'एनएफसी कार्ड साउंडबॉक्स' चे लाँच पेटीएम साउंडबॉक्सचं नवीन अपडेट आहे. पेटीएम भारतातील सर्वात प्रिय आणि यशस्वी पेमेंट डिव्हाइस आहे.

छोट्या दुकानदारांनाही स्वीकारता येणार कार्ड पेमेंट; पेटीएमकडून NFC कार्ड साऊंडबॉक्स लाँच
Paytm FASTag Close: आजपासून बंद, तुमचे पैसे कसे मिळणार परत? जाणून घ्या

'पेटीएम एनएफसी कार्ड साउंडबॉक्ससह, व्यापारी कोणत्याही युपीआय अ‍ॅपमधून मोबाइल पेमेंट आणि एकाच डिव्हाइसद्वारे एनएफसी-आधारित डेबिट आणि क्रेडिट कार्ड पेमेंट स्वीकारू शकतात. पेटीएम एनएफसी कार्ड साउंडबॉक्सला ऑफलाइन व्यापाऱ्यांसाठी सर्वोत्तम उपाय बनवते', असेही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com