Viral Video: दुकानाबाहेर उभी असलेली वृद्ध महिला अचानक हवेत गेली; दुकानदार बाहेर आला अन्...

Woman Viral Video: एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात दुकानाच्या बाहेर उभी असलेली महिला अचानकपणे हवेत लटकल्याचे दिसते.
Viral Video
Viral Videosaam digital
Published On

Woman Standing Outside Shop Hanging

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला जगभरात घडणाऱ्या अनेक विचित्र गोष्टी समजतात. अनेकवेळा या माध्यमातून अनेकांना हरवलेली व्यक्ती परत मिळाले आहेत. मीडिया प्लॅटफॉर्म (Platform) मनोरंजनाचा उत्तम मार्ग समजला जातो..('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Viral Video
Dog Viral Video: कुत्र्याच्या 'अ‍ॅक्टिंग'ने 'व्हिलन' अटकेत; बदमाशाचा किडनॅपिंगचा प्रयत्न फसला, थरारक Video समोर

या माध्यमावर जगभरातील गमतीदार तर कधी थरारक गोष्टी पाहायल मिळतात,त्यात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात दुकानाच्या बाहेर उभी असलेली महिला अचानकपणे हवेत लटकल्याचे दिसते. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण आश्चर्यात पडला आहे की नक्की महिलेसोबत काय झाले. सर्व घटना दुकाना बाहेरील सीसीटीव्हीमध्ये(Cctv) कैद झाली असून सध्या व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय.

व्हायरल व्हिडिओत एक महिला दुकानाच्या बाहेर उभी आहे. तिच्यापाठी असलेले दुकान बंद असल्याने दुकान उघडण्याची वाट पाहत आहे. महिला अगदीजवळच दुकानाच्या शर्टरजवळ उभी आहे. काही वेळानंतर दुकानाचे शर्टर उघडण्यास सुरुवात होते. मात्र शर्टरजवळ उभी असलेल्या महिलेचे जॅकेट त्या उघडत असलेल्या शर्टरमध्ये जाऊन अडकते आणि ते उघडण्याचा वेग जास्त असल्याने महिलाही वर खेचली जाते. दरम्यान एक व्यक्ती येतो आणि महिलेला व्यवस्थित पकडून खाली उतरवतो. नशिब बलवत्तर म्हणून या महिलेला जराही दुखापत झालेली नाही.

@goodnews_movement या इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हायरल व्हिडिओ ब्रिटेनमधील असल्याचे समजते.व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून अनेक लाईक्स मिळत आहे तसेच अनेक नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया व्हिडिओवर येत आहेत त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,' नशीब काही लागल नाही यांना' तर काहींनी त्या व्यक्तींचे कौतुक केले आहे.

Viral Video
Dog Viral Video: कुत्र्याच्या 'अ‍ॅक्टिंग'ने 'व्हिलन' अटकेत; बदमाशाचा किडनॅपिंगचा प्रयत्न फसला, थरारक Video समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com