Paytm App कार्यरत राहणार का नाही? जाणून घ्या पेटीएम संदर्भातल्या तुमच्या प्रश्नांचे उत्तर

Paytm ला मल्टी-बँक मॉडेल अंतर्गत नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून तृतीय पक्ष ॲपचा परवाना मिळालाय. येस बँक पेटीएमच्या विद्यमान आणि नवीन UPI ​​व्यापाऱ्यांसाठी व्यापारी संपादन बँक म्हणून काम करेल.
Paytm App कार्यरत राहणार का नाही? जाणून घ्या पेटीएम संदर्भातल्या तुमच्या प्रश्नांचे उत्तर

Know Answers Your Queries about Paytm :

देशातील पेटीएम युझर्संसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. NPCI ने Paytm ला थर्ड पार्टी ऍप्लिकेशन प्रोव्हायडर (TPAP) म्हणून काम करण्याची परवानगी दिली आहे. NPCI हे UPI चे पालक आणि ऑपरेटर आहेत. पेटीएमची मूळ कंपनी One97 ला मल्टी-बँक मॉडेल अंतर्गत थर्ड पार्टी ॲप्लिकेशन म्हणून ऑपरेट करण्याची परवानगी देण्यात आलीय. दरम्यान नुकतेच करण्‍यात आलेल्‍या घोषणेमुळे वापरकर्त्‍यांच्‍या मनात पेटीएम अॅपच्‍या कार्यक्षमतेबाबत प्रश्‍न निर्माण झाले असतील. परंतु पेटीएम अॅप कार्यरत असून ते १५ मार्च २०२४ नंतर देखील कार्यरत राहील. (Latest News)

तुमच्या मनातील प्रश्न

1. पेटीएम अॅप आणि त्‍यांच्‍या सेवा १५ मार्चनंतर देखील कार्यरत राहतील का?

हो, वापरकर्ते कोणत्‍याही व्‍यत्‍ययाशिवाय पेटीएम अॅपवरील सेवा वापरणे सुरू ठेवू शकतात.

2. पेटीएम क्‍यूआर कोड, साऊंडबॉक्‍स, कार्ड मशिन्‍स विनासायास कार्यरत राहतील का?

हो, पेटीएम क्‍यूआर कोड्स, साऊंडबॉक्‍स आणि कार्ड मशिन्‍स पूर्णपणे कार्यरत राहतील.

3.पेटीएम अॅपवर इतर सर्व सेवा चित्रपट, इव्‍हेण्‍ट्स, प्रवास (मेट्रो, फ्लाइट, ट्रेन, बस) तिकिटे बुकिंग्‍ज यांचा लाभ घेता येतील?

हो, सर्व सेवांचा लाभ घेता येईल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

4.पेटीएम अॅपवर मोबाइल/इंटरनेट रिचार्ज करणे, युटिलिटी बिल भरणे आणि इतर सेवा सुरू ठेवू शकतो का?

वापरकर्ते पेटीएम अॅपच्‍या माध्‍यमातून त्‍यांचे मोबाइल फोन, डीटीएच किंवा ओटीटी सबस्क्रिप्‍शन्‍स रिचार्ज करणे आणि सर्व युटिलिटी बिल भरणे (वीज, पाणी, गॅस, इंटरनेट) सुरू ठेवू शकतात.

5. पेटीएम डिल्सवर रेस्‍टॉरंट ऑफर्सचा फायदा घेणे सुरू ठेवू शकतो का?

हो, पेटीएम डिल्‍स १५ मार्चनंतरदेखील पूर्वीप्रमाणे कार्यरत राहतील. वापरकर्ते कोणत्‍याही व्‍यत्‍ययाशिवाय सर्व ऑफर्स सूटचा आनंद घेणे सुरू ठेवू शकतात.

6.पेटीएम अॅपवर सिलिंडर बुक करण्‍यासह माझे पाइप्‍ड गॅस बिल भरू शकतो का, तसेच पेटीएम अॅपवर अपार्टमेंटचे वीजेचे बिल भरू शकतो का?

हो.

7. पेटीएम अॅपचा वापर करत विमा खरेदी करण्‍यासह विम्‍याचा प्रीमियम भरू शकतो का?

हो युझर्स पेटीएम अॅपचा वापर करत बाईक, कार, आरोग्‍य अशा बाबींसाठी नवीन विमा पॉलिसी खरेदी करू शकतात, तसेच प्रीमियम्‍स भरू शकतात.

8.पेटीएम अॅपचा फास्‍टटॅग खरेदी करू शकतो का, तसेच माझ्या इतर बँकांचे फास्‍टटॅग रिचार्ज करू शकतो का?

हो , आम्‍ही पेटीएम अॅपवर एचडीएफसी बँक फास्‍टटॅग्‍स ऑफर करत आहोत. इतर सहयोगी बँकांचे फास्‍टटॅग रिचार्ज सेवादेखील देत आहोत. तुम्‍ही पेटीएम पेमेंट्स बँक फास्‍टटॅग्‍स खरेदी करू शकत नाही, तरीही ते १५ मार्चपूर्वी खरेदी करू शकता आणि शिल्‍लक संपेपर्यंत वापरू शकता.

9. इक्विटी, म्‍युच्‍युअल फंड्स आणि एनपीएसमधील माझ्या गुंतवणूका सुरक्षित आहेत का?

हो, पेटीएम मनीसह ग्राहकांच्‍या इक्विटी, म्युच्‍युअल फंड्स किंवा एनपीएसमधील गुंतवणूका कार्यरत आहेत. पेटीएम मनी लिमिटेड सेबी-नियामक आणि अनुपालन करणारी आहे.

10. पेटीएम अॅपवर सोने खरेदी-विक्री करणे सुरू ठेवू शकतो का?

हो, तुम्‍ही अॅपवर डिजिटल गोल्‍डची खरेदी-विक्री सुरू ठेवू शकता. तसेच, तुमचे पेटीएम गोल्‍ड इन्‍व्‍हेस्‍टमेंट्स कार्यरत आहेत आणि एमएमटीसी-पीएएमपीसह सुरक्षित आहेत.

11.पेटीएम अॅपवर माझे क्रेडिट कार्ड बिल भरू शकतो का?

हो

12. पेटीएमवरील यूपीआय सेवा १५ मार्चनंतर देखील सुरू राहतील का?

भारतीय रिझर्व्‍ह बँकेने (आरबीआय) नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ला टीपीएपीसाठी पेटीएमच्‍या विनंतीचे परीक्षण करण्‍याचे निर्देश दिले आहेत. एनपीसीआयसोबत सहयोगाने काम करत आहोत आणि त्‍यासंदर्भात माहिती मिळेल. https://rbi.org.in/Scripts/BS_PressReleaseDisplay.aspx?prid=57376

13. कोणतीही अडचण न येता माझे पैसे सेटल होतील का?

तुमच्‍या विद्यमान पेटीएम पेमेंट्स बँक लि. खात्‍यामधील सेटलमेंट १५ मार्च २०२४ पर्यंत कोणत्‍याही समस्‍येशिवाय कार्यरत राहील. खात्‍यामधील शिल्‍लक १५ मार्च २०२४ नंतर देखील काढता येऊ शकते. पण एकसंधी सेटलमेंट्ससाठी इतर बँकांमध्‍ये असलेल्‍या तुमच्‍या इतर कोणत्‍याही बचत किंवा चालू खात्‍यांकरिता पेटीएम पेमेंट्स बँक लि. मधील बिझनेस अॅपसाठी पेटीएममधील तुमचे सेटलमेंट खाते बदलावे लागले.

14. मर्चंट्स पीपीबीवरून इतर बँकेमध्‍ये त्‍यांचे सेटलमेंट बँक खाते कशाप्रकारे बदलू शकतात?

मर्चंट्स बिझनेस प्रोफाइलच्‍या माध्‍यमातून किंवा मेन्‍यूच्‍या डाव्‍या बाजूस असलेल्‍या सेटलमेंट सेटिंग्ज पर्यायाच्‍या माध्‍यमातून 'चेंज सेटलमेंट अकाऊंट' पेज उघडत सेटलमेंट खाते बदलू शकतात. त्‍यानंतर सेटलमेंट अकाऊंटवरील चेंज बटनवर क्लिक करा. शेवटची पायरी म्‍हणजे सध्याचे खाते निवडून सेव्‍हवर क्लिक करा. ओटीपी प्रविष्‍ट करा किंवा अॅड ए न्‍यू बँक अकाऊंट ऑप्‍शन निवडा आणि त्‍यानंतर आवश्‍यक माहिती भरा.

Paytm App कार्यरत राहणार का नाही? जाणून घ्या पेटीएम संदर्भातल्या तुमच्या प्रश्नांचे उत्तर
RBI चा Paytm युजर्सला मोठा दिलासा! आता या तारखेपर्यंत वापरू शकता पेटीएम पेमेंट बँक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com