Paytm चा मोठा निर्णय! युजर्सना येणार पॉपअप मेसेज, UPI वापरण्यासाठी करावे लागणार हे महत्त्वाचे काम

UPI ID : आरबीआयने पेटीएम बँकेवर याआधीच बंदी घातली होती. आता यामध्ये पुन्हा मोठा बदल होणार आहे. पेटीएम वापरकर्त्यांना लवकरच युपीआय आयडी बदलावा लागणार आहे.
Paytm Payment Bank
Paytm Payment BankSaam Tv
Published On

Paytm New Rule :

आरबीआयने पेटीएम बँकेवर याआधीच बंदी घातली होती. आता यामध्ये पुन्हा मोठा बदल होणार आहे. पेटीएम वापरकर्त्यांना लवकरच युपीआय आयडी बदलावा लागणार आहे.

लवकरच कंपनी वापकर्त्यांना नवीन UPI आयडी देण्याची सुविधा देणार आहे. यासाठी पेटीएम (Paytm) टायअप कंपनीसोबत UPI आयडी बदलू शकतात. पेटीएमची कंपनी One 97 Communications (OCL) ला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून मान्यता मिळाली आहे. यासाठी ते वापरकर्त्यांना नवीन बँकेत (Bank) स्थलांतरित करु शकते. यानंतर ते त्यांचे पेमेट सुरु करतील.

NPCI ने १४ मार्च २०२४ रोजी OCL ला थर्ड पार्टी अॅप्लिकेशन प्रोव्हायडर (TRAP)म्हणून काम करण्याची मान्यता दिली. त्यानंतर Paytm ने Axis Bank, HDFC बँक, SBI बँक, यश बँकेसोबत पार्टनरशीप केली. या बँका आता पेटीएम वापरकर्त्यांना ट्रॅप अंतर्गत सुविधा पुरवतील.

Paytm Payment Bank
Today's Gold Silver Rate: सोनं ७५ हजार पल्ल्याड, चांदीच्या दरातही वाढ; वाचा आजचे नवे दर

मीडिया रिपोर्टनुसार या बदलांनुसार सर्व पेटीएम यूपीआय वापरकर्त्यांना लवकरच पॉपअप मिळेल. या पॉपअपद्वारे वापरकर्त्यांकडून संमती मागितली जाईल. त्यांना @ptsbi, @pthdfc, @ptaxis आणि @ptyes सारख्या चार बँकांपैकी कोणत्याही UPI हँडलपैकी एक निवडावा लागेल.

Paytm Payment Bank
Petrol Diesel Rate 18th April 2024: पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर; जाणून घ्या लेटेस्ट दर

यानंतर वापरकर्ते पूर्वीप्रमाणेच पेटीएमवर यूपीआय वापरु शकतात. यामधून पेमेंट प्राप्त करता येईल तसेच ट्रान्सफरही करता येईल. QR कोड इत्यादींमध्ये बदल केले जातील की, नाही याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com