Railway New Rules: रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! १ मार्चपासून तिकीट बुकिंगचे नियम बदलणार; हे अ‍ॅप आता अनिवार्य

Railway New Rules From 1st March: रेल्वेच्या नियमात १ मार्चपासून बदल होणार आहेत. रेल्वेच्या तिकीट बुकिंगसाठी आता नवीन अॅप सुरु करण्यात आले आहे. तुम्ही रेलवन अॅपवरुन रेल्वेसंबंधित सर्व कामे करु शकतात.
Railway New Rules
Railway New RulesSaamTv
Published On
Summary

रेल्वेच्या नियमात बदल

१ मार्चपासून बदलणार नियम

आता रेलवन अॅपवरुन करता येणार तिकीट बुक

रोज कोट्यवधी लोक ट्रेनने प्रवास करतात. ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.अनेकजण आरक्षित तिकीटावर प्रवास करतात तर काहीजण जनरल तिकीटावर प्रवास करतात. दरम्यान, आता १ मार्चपासून ट्रेनच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. तुम्हाला हे नियम माहित असायलाच हवेत.

Railway New Rules
Rule Change 1st January: थेट तुमच्यावर परिणाम, नव्या वर्षांपासून १० नियमात मोठा बदल, वाचा

ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम (Railway Ticket Booking Rule Change)

रेल्वे तिकिट बुकिंगच्या नियमात बदल केले आहेत. यामध्ये आता तुम्ही नवीन रेलवन अॅपद्वारे तिकीट बुक करु शकणार आहात. याआधी यूटीएस अॅपवरुन तिकीट बुक करत होते. आता हे अॅप बंद होणार आहे. तुम्हाला एकाच रेलवन अॅपवर तिकीट बुकिंग, प्लॅटफॉर्म तिकीट बुक करता येणार आहे. रेलवन अॅप वापरण्यासाठी खूप सोपे आहे.

१ मार्चपासून यूटीएस अॅपचा वापर बंद होणार आहे. त्याजागी रेलवन अॅप वापरावे लागणार आहे. यामध्ये तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट,सीट आरक्षण, ट्रेनचा लाइव्ह स्टेट्‍स, ठिकाण या सर्व गोष्टींची माहिती मिळवू शकतात. तुमची सर्व कामे एकाच ठिकाणी होणार आहे.

Railway New Rules
Credit Card Rules: क्रेडिट कार्डच्या नियमात ५ मोठे बदल; १ एप्रिलपासून थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

अशा पद्धतीने करा रेल्वे तिकीट बुक (How to Book Railway Ticket on Railone)

सर्वात आधी तुम्ही RailOne अॅपवर जायचे आहे.

यानंतर तुम्हाला जर्नी फ्लानवर जायचे आहे. तिथे तुम्हाला ऑप्शन दिसणार आहे.

त्यामध्ये जर जनरल तिकीट बुक करायचे असेल तर Unreserved ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला From Station आणि To Station वर माहिती भरायची आहे. यासाठी तुम्हाला लोकशन ऑन करावे लागेल.

यानंतर तुम्हाला मेल, एक्सप्रेस आणि सुपरफास्ट ट्रेनच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.

यानंतर तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे. यानंतर पेमेंट करायचे आहे.

पेमेंट करण्याआधी सर्व डिटेल्स एकदा चेक करा. तिकीट बुक झाल्यानंतर तुम्हाला My Tickets वर तिकीटाचे पीडीएफ येणार आहे.

Railway New Rules
Loan Recovery Rules: कर्जदाराचा मृत्यू झाल्यास उर्वरित कर्ज कोण फेडणार? गॅरेंटरलाही बसतो फटका; नियम काय सांगतात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com