Public Holiday: ३ की ४ मार्च, होळीनिमित्त बँकांना सुट्टी कधी? वाचा सविस्तर

Public Holiday on Holi 2026: होळीला सार्वजनिक सुट्टी असते. दरम्यान, होळीला सुट्टी कधी असणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ३ की ४ मार्चला सुट्टी असणार आहे याबाबत माहिती समोर आली आहे.
 Public Holidays
Public HolidaysSaam Tv
Published On
Summary

होळीची सुट्टी नक्की कधी?

३ की ४ मार्चला असणार सुट्टी?

वाचा सुट्ट्यांची यादी

देशभरात होळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. उद्या २ मार्च रोजी होळीचे दहन केले जाणार आहे. दरम्यान,वेगवेगळ्या राज्यात होळीसाठी वेगवेगळ्या दिवशी सुट्टी असते. यंदा ३ मार्च की ४ मार्चला सुट्टी असणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या दोन्ही दिवशी धुलिवंदन असल्याने नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, आता सरकारी सुट्टीबाबत संभ्रम दूर झाला आहे.

 Public Holidays
Public Holiday : पुढच्या गुरूवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी, शाळा-सरकारी कार्यालये राहणार बंद

भारतीय रिझर्व्ह बँकेने मार्च २०२६ साठीच्या सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये विविध सणांसाठी वेगवेगळ्या राज्यातील बँका बंद असणार आहेत. त्यामुळे तुमच्या राज्यात किती तारखेला होळीची सुट्टी असणार आहे हे जाणून घ्या. जर तुमचे बँकेत काही काम असेल तर तुम्ही ही यादी वाचूनच जा.

होळीच्या सुट्टी

होळीला रंग खेळण्याचा दिवस ३ आणि ४ मार्चला आहे. परंतु रिझर्व्ह बँकेने विविध राज्यानुसार सुट्टी जाहीर केली आहे.

२ मार्च- होळी दहननिमित्त कानपुर आणि लखनऊमध्ये बँका बंद असणार आहे.

३ मार्च-होळी, धुलिवंदनामुळे मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, पाटणा, रांची, भोपाळ, देहारादून, गुवाहाटी, हैदराबाद, नागपुर, पणजी, बेलापूर, विजयवाडा येथे बँकांना सुट्टी

४ मार्च- बुधवारी देशातील अनेक ठिकाणी बँका बंद असणार आहेत. नवी दिल्ली, अहमदाबाद, लखनऊ, कानपूर, पाटणा, रांची, चंदीगढ, शिमला, जम्मू, जयपूर, भुवनेश्वर, आगरताला, ईटानगर, शिलाँग, इम्फाल येथी बँका बंद असणार आहेत.

 Public Holidays
Public Holiday: गुरुवारी राज्यातील सर्व शाळा अन् बँका बंद; कारण काय?

होळीनंतर बँकांच्या सुट्टी (Bank Holiday)

१३ मार्च रोजी चपचार कुट आहे त्यानिमित्त अनेक राज्यात बंद असणार आहे.

१७ मार्च रोजी जम्मू काश्मीरमधील बँका बंद असणार आहे.

१९ मार्च रोजी गुढी पाडवानिमित्त महाराष्ट्रात बँका बंद असणार आहे.

२०-२१ मार्च रोजी ईद उल फितरिमित्त बँकांना सुट्टी असणार आहे.

२६-२७ मार्च रोजी रामनवमीनिमित्त बँका बंद असणार आहे.

या दिवशी अनेक राज्यातील बँकांना सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे या दिवशी तुम्ही बँकेत जाऊ नका. दरम्यान, ऑनलाइन बँकिंग, यूपीआय, एटीएम सेवा सुरु राहणार आहेत.

 Public Holidays
School Holiday: ३ की ४ मार्च, शाळांना होळीची सुट्टी कधी?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com