PNB Recruitment: खुशखबर! पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची संधी; ५१३८ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Punjab National Bank Recruitment: पंजाब नॅशनल बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ५ हजारपेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
 PNB Recruitment
PNB RecruitmentSaam Tv
Published On

शिक्षण पूर्ण झालंय अन् नोकरी शोधत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. तुम्हाला चांगल्या सरकारी बँकेत काम करण्याची संधी मिळणार आहे. पंजाब नॅशनल बँकेत भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकेत ५ हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती केली जाणार आहे.

पंजाब नॅशनल बँकेतील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया उद्यापासून म्हणजेच ८ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. अप्रेंटिस पदासाठी ही भरती केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे.

 PNB Recruitment
RBI Jobs: कोणतीही परीक्षा नाही थेट RBI मध्ये नोकरी; मिळणार भरघोस पगार; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

पंजाब नॅशनल बँकेत ५१३८ पदांसाठी भरती केली जाणार आहे. तुम्हाला pnb.bank.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०२६ आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे.

पंजाब नॅशनल बँकेतील या नोकरीसाठी लेखी परीक्षा १ मार्च २०२६ रोजी होण्याची शक्यता आहे. उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी, लोकल लँग्वेज टेस्ट आणि मेडिकल टेस्टद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी ट्रेनिंगचा कालावधी १ वर्षांचा असणार आहे.

 PNB Recruitment
SBI Jobs: कोणत्याही परीक्षेशिवाय स्टेट बँकेत नोकरी, पॅकेज ४४ लाख; ९९६ जागांसाठी भरती; आजच अर्ज करा

पात्रता काय? (Eligibility)

पंजाब नॅशनल बँकेतील या नोकरीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले असावे. याचसोबत स्थानिक भाषा वाचता, लिहता यायला हवी. उमेदवाराचे वय २० ते २८ मध्ये असायला हवे. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

अर्ज कसा करावा? (Application process)

सर्वात आधी तुम्हाला pnb.bank.in या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर Employment Opportunities सेक्शनवर जा. यानंतर PNB Apprentice Program 2025-26 लिंकवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला आवश्यक माहिती भरायची आहे. नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती भरा आणि अर्ज सबमिट करा.

 PNB Recruitment
Prasar Bharti Job: प्रसार भारतीमध्ये सरकारी नोकरीची संधी; पात्रता काय? अर्ज कसा करावा? वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com