PM Nai Roshni Yojana: महिलांसाठी सरकारमार्फत मोठी योजना; प्रशिक्षण घेऊन देशातील प्रत्येक स्त्री होणार आत्मनिर्भर

PM Nai Roshni Yojana: एक कुटुंब आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्यास काही काळाने संपूर्ण देशाचा विकास होण्यास मदत होईल.
PM Nai Roshni Yojana
PM Nai Roshni YojanaSaam TV
Published On

PM Nai Roshni Yojana:

देशाचा विकास करायचा असेल आणि देश पुढे न्यायचा असेल तर महिलांना सोबत घेऊन चालणे गरजेचे आहे. महिला सक्षम असणे आणि स्वतःच्या पायांवर उभ्या असणे देखील फार गरजेचे आहे. त्याने कुटुंबातील आर्थिक स्थर स्थिर राहण्यास मदत होते. एक कुटुंब आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्यास काही काळाने संपूर्ण देशाचा विकास होण्यास मदत होईल. (Latest PM Nai Roshni Yojana News)

यामुळेच केंद्र सरकारने स्त्रियांसाठी एक अनोखी योजना आणली आहे. नई रोशनी योजना असं या योजनेचं नाव आहे. या योजनेत जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा आणि योजनेचा लाभ करून घ्यावा असं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे. नई रोशनी योजनेचा लाभ घेण्यासाठी गरीब कुटुंबातील महिलांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.

PM Nai Roshni Yojana
PM Kisan Yojna: शेतकऱ्यांना 1 एप्रिलपासून पीएम किसान योजनेत जास्त निधी मिळणार? 6 हजारांऐवजी मिळणार...

या योजनेमार्फत महिलांना विविध गोष्टींचे ज्ञान दिले जाणार आहे. बँकिंग, ऑनलाईन पेमेंट, संवाद अशा विविध गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. यामुळे महिलांना समाजात वावरताना कोणत्याही गोष्टीत अडथळा राहणार नाही. आपल्या अडचणी त्या स्वतः सहज सोडवू शकतील.

दैनंदिन जीवनातील व्यावहारिक ज्ञान, स्वच्छ भारत, वैद्यकीय, राजकीय, महिलांसाठी असलेले अधिकार या सर्वच गोष्टींची माहिती दिली जाणार आहे. यासह महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी मदत केली जाणार आहे.

PM Nai Roshni Yojana
PM Kisan Yojna : 12 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी येणार? चेक करा मोठी अपटेड

या योजनेत अपंग महिलांना देखील संधी दिली जाणार आहे. 75 टक्के गरीब कुटुंबातील महिलांना यात प्राधान्य आहे. अन्य वर्गातील महिलांसाठी 25 टक्के देण्यात आलेत.

नई रोशनी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधी http://nairoshni-moma.gov.in/ या संकेस्थळावर भेट द्यावी लागेल. पुढे तुम्हाला तुमचे पहिल्यांदा रजिस्टेशन करावे लागेल. विचारलेली माहिती भरल्यानंतर एक OTP येईल. त्यानंतर तुमचे राजिस्टेशन झाल्यावर लॉगिन करावे लागेल. पुढे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही फॉम भरू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊन आत्मनिर्भर होऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com