PM Kisan Yojna : 12 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी येणार? चेक करा मोठी अपटेड

केंद्र सरकारने 2019 मध्ये पंतप्रधान किसान योजना सुरू केली होती.
farmer
farmerSaam TV
Published On

मुंबई : केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा (PM Kisan Yojna) बारावा हप्ता कधी येणार या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. शेतकऱ्यांना 12 वा हप्ता 30 सप्टेंबरपर्यंत ट्रान्सफर करण्यात येणार असल्याचे बोललं जात होतं. मात्र तारीख उलटून गेल्यानं आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये कधी येणार हा प्रश्न आहे.

farmer
नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका; म्हणाले, ठाकरेंना पुरुषार्थ...

केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान योजनेचा 12 वा हप्ता उद्या म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी ट्रान्सफर करू शकते. 2 ऑक्टोबरला लाल बहादूर शास्त्री आणि महात्मा गांधी यांची जयंती आहे. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक मोठे निर्णय घेतले होते. त्यांनी जय जवान, जय किसानचा नाराही दिला होता.

farmer
Pune : चांदणी चौकातील पूल पाडण्याबाबत नवीन अपडेट समोर; पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती

तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनीही शेतकऱ्यांसाठी मोठा लढा दिला. केंद्र सरकारला शेतकऱ्यांचे (Farmer) पैसे टान्सफर करण्याचा हाच योग्य दिवस आहे, असं बोललं जात आहे.

केंद्र सरकारने 2019 मध्ये पंतप्रधान किसान योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू असलेल्या शेतकऱ्यांना सरकार दरवर्षी 6000 रुपये देते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. प्रत्येक हप्त्यात 2000 रुपये ट्रान्सफर केले जातात.

शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 11 हप्त्याचे पैसे आधीच आले आहेत. शेवटचे हप्ते 11,19,83,555 कोटी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले. आता 12 व्या हप्त्यासाठी 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांचा समावेश आहे. मात्र, यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com