निवृत्ती बाबर -
मुंबई: मी इथे आलो आणि मला सत्कारच्या वेळी 'पुरुषार्थ' हे पुस्तक दिलं, हे पुस्तक मला नाही उद्धव ठाकरेंना दिलं पाहिजे अशी बोचरी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane ) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केली आहे.
मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे राबवले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून आज भाजपच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं, या कार्यक्रमात राणे बोलत होते.
पाहा व्हिडीओ -
राणे म्हणाले, मोदींच्या वाढदिवसाला भारतीय जनता पक्षांने 15 दिवस विविध कार्यक्रम घेतले. या भव्य मेळाव्याला प्रतिसाद मिळाला. आपण भाजपचे कार्यकर्ते आहोत शिवसनेचे नाही, राष्ट्रवादीचे नाही, काँग्रेसचे तर नाहीच नाही बोंबलत फिरायला असा टोला देखील त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.
मला एक वर्ष मंत्री होऊन झाले मी सव्वा लाख उद्योजक तयार केले. महाराष्ट्रात मी 60 टक्के ठिकाणी जाऊन आलोय मोदींच जागतिक कीर्तिच व्यक्तिमत्व आहे. जगात त्यांच कौतुक केलं जातं. सर्वांनीचं विरोधकांना उत्तर दिलं पाहिजे असं नाही.
कार्यकर्ते सक्षम असले तर निवडणूक लढवण्यासाठी पैसे कमी लागतात, 2014 ची निवडणुक मोदी साहेबांमुळे जिंकलो, 2019 ची पण निवडणुक आपण मोदींमुळे जिंकलो, तर 2024 च्या निवडणुकीची तयारी जोरात केली पाहिजे. 2024 ला मोदी आणि तुम्ही मिळून निवडणूक जिंकायला हवी असं राणे म्हणाले.
तसंच वेदांतावरुन देखील त्यांनी सेनेवर निशाणा साधला, 'वेदांताबद्दल फार बोलतायत, आशिष शेलार कवी आहेत हे आज कळलं, चाफा फुलेना वैगरे ते बोलले, पण चाफा असला कसला कि जो उगवत नाही, फुलत नाही.
अडीच वर्ष काय केल त्यांनी? आता रोज फक्त शिंदे आणि फडणवीस यांच्यावर टीका करतायत. मी सांगेन त्यांना उत्तर देऊ नका, आपला वेळ वाया घालवू नका काम करा, साहेब साहेब होते साहेबांच्या नखाची सर देखील नाही याला, कशाची सर देऊ याला, कोळसाही नाही म्हणू शकत अशी जहरी टीका राणे यांनी यावेळी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.