चेतन व्यास -
वर्धा: अनेक जण आपण सर्पमित्र (Snake Friend) असल्याची बतावणी करुन सापांना हातात पकडण्याचं धाडस करतात. मात्र, केवळ साप पकडण्याची कला अवगत होऊन फायदा नाही तर, आपण पकडत आहे तो साप कोणत्या जातीचा आहे.
तो विषारी (Poisonous) आहे का नाही ? याची माहिती नसेल तर ते साप पकडणं आपल्या जीवावर देखील बेतू शकतं. असाच एक प्रकार वर्ध्यात घडला असून साप पकडण्याच्या नादात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.
पाहा व्हिडीओ -
धामण समजून साप हाताळत फिरणं युवकाच्या जीवावर बेतल आहे. विषारी सापानं दंश केल्यानं युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वर्ध्यात (Wardha) घडली आहे. सापांबद्दलच्या अज्ञानामुळे युवकाला जीव गमवावा लागला. सापासोबतचा युवकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे.
बबलू काकडे राहणार सानेवाडी वर्धा असं मृत युवकाच नाव असल्याचं सांगण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी बबलू काकडे याने साप पकडला. हा साप बिनविषारी धामण असल्याची बतावणी करीत तो परिसरात फिरल्याच सांगत फिरत होता, मात्र आपण हातात घेतलेली धामण नसून तो साप मण्यार जातीचा आहे हे त्याच्या लक्षात आलं नाही.
त्यामुळे बबलू गाफिल राहिला आणि हातात पकडलेला साप सोडायला गेला असता सापाने त्याला दंश केला. त्यानंतर त्याची प्रकृती रात्री बिघडल्यानं त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं. मात्र तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे असे प्रकार टाळत जागरूक राहण्याची गरज आहे.
सापांबद्दलच्या अज्ञानामुळे मागील वर्षी सागर महाजन, राहुल समर्थ यांचा मृत्यू तर आता बबलू काकडेला जीव गमवावा लागला. बबलूच्या परिवारात आई, दोन भाऊ, दोन बहिणी असून त्याच्यावर शुक्रवार सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.