

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी
पीएम किसान योजनेचा हप्ता काही शेतकऱ्यांसाठी बंद
२३ वा हप्ता कधी येणार?
भारतात शेतकऱ्यांसाठी अनेक मदतीच्या योजना राबविल्या जातात. याचा फायदा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या उपकरणांना आणण्यासाठी होतो. त्यातच केंद्र सरकारने पीएम किसान योजना राबवली आहे. त्याचे आत्तापर्यंतचे २२ हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. महत्वाचं म्हणजे पुढील हप्ता (PM Kisan Yojana 23rd Instalment) कधी येणार? याची अपडेट अद्याप आलेली नाही. त्यात काही शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही अशी महत्वाची अपडेट समोर आली आहे. पुढील बातमीत आपण याचं कारण जाणून घेणार आहोत.
केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेत ६००० रुपये दिले जातात. आत्तापर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. मात्र आता नव्या अपडेटनुसार सरकारने स्पष्ट केलं आहे की, २३ साव्या हप्त्याचा लाभ सगळ्यात शेतकऱ्यांना मिळणार नाही. हा निर्णय घेण्यामागचं कारण म्हणजे गरजू शेतकऱ्यांना, पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ मिळेल. तसेच बनावट कागपत्रं आणि माहिती देणाऱ्यांना हप्ते दिले जाणार नाहीत.
केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, ज्या शेतकऱ्यांना अजुनही त्यांच्या खात्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना २३ वा हप्ता दिला जाणार नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी असा आदेश दिला आहे. सरकारने हा निर्णय डिजिटल फसवणूक आणि चुकीच्या गोष्टी थांबवण्यासाठी घेतला आहे. शेतकऱ्यांनी यामध्ये सरकारी रेकॉर्डनुसार शेतीची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर २३ वा हप्ता हा जून- जुलै दरम्यान येणार अशी शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी जमिनीची कागदपत्रं त्यांच्या पीएम किसान खात्याशी जोडली पाहिजेत. अन्यथा त्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. बरेच शेतकरी या दोन महत्त्वाच्या कामांकडे लक्ष देत नाहीत. पण नव्या अपडेटच्या मदतीने प्रशासनाने हे स्पष्ट केलं की, हे नियम कठोरपणे पाळले जाणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.